दिवसभर टोल वसुली बंद
By Admin | Updated: January 22, 2015 02:40 IST2015-01-22T02:40:30+5:302015-01-22T02:40:30+5:30
रामटेक तालुक्यातील मनसर आणि बुटीबोरी नजीकच्या बोरखेडी येथील टोल नाके बंद करण्यासाठी बुधवारी सकाळी ७ वाजतापासून शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वात ....

दिवसभर टोल वसुली बंद
नागपूर : रामटेक तालुक्यातील मनसर आणि बुटीबोरी नजीकच्या बोरखेडी येथील टोल नाके बंद करण्यासाठी बुधवारी सकाळी ७ वाजतापासून शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामुळे या नाक्यांवर दिवसभर टोल वसुली बंद होती. मनसर येथील नाक्यावर दुपारी २ वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या या प्रयत्नाला आंदोलनकर्त्यांनी विरोध केला. दुपारी १ वाजताच्या सुमारास शोभाताई फडणवीस आंदोलस्थळी पोहोचल्या. त्यावेळी त्यांनी टोलविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले. या आंदोलनात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिक संघर्ष समिती, ट्रक वाहतूकदार असोसिएशन, ब्रिक्स असोसिएशन तसेच इतर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनात रामटेकचे आमदार. डी. मल्लिकार्जुन रेड्डी सहभागी झाले नव्हते. बोरखेडी नाक्याजवळ शोभातार्इंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. येथे सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास आंदोलकांनी वाहने अडवायला सुरुवात केली. तासभरात नाक्याच्या दोन्ही बाजूूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. काही वाहनचालकांनी आडमार्गाने वाहने वळवून मार्ग काढला. मात्र, अनेकांना दोन ते अडीच तास ताटकळत रहावे लागले. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)