शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

आयुक्त तुकाराम मुंढे अचानक पोहचले डम्पिंग यार्डवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 15:12 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास भांडेवाडी येथील डंपिंग यार्डला भेट दिली.

ठळक मुद्देमनपा अधिकाऱ्यांची उडाली तारांबळओला व सुका कचरा वेगळा न ठेवणाऱ्यांना दंड आकारण्याचे फर्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:   :   महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी सकाळी नऊ  वाजताच्या सुमारास भांडेवाडी डम्प्ािंग यार्डचा अचानक पाहणी केली. ओला आणि सुक्या कचऱ्याचा एकत्र ढिग पाहून ते संतापले. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून दिला पाहिजे. परंतु अजूनही येथे एकत्रित कचरा येत आहे. त्यात प्लास्टीकचाही समावेश असल्याने त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यापुढे ओला व सुका कचरा वेगळा संकलीत न करणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुंढे यांच्या अचानक दौऱ्यामुळे मनपा अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच मुंढे यांनी स्वच्छतेचा मुद्दा हाती घेतला. स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. अशी तंबी आरोग्य विभागाचे अधिकारी व कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांना दिली. जे नागरिक ओला आणि सुका कचरा वेगळा देत असतील त्याचीच उचल करा, याबाबत वारंवार सूचना दिल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यावर मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी,आरोग्य अधिकारी (स्वच्छता)डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कचरा व्यवस्थापन, बायोमायनिंग प्रक्रीया, कंपोस्टिंग प्रकल्पाची माहिती जाणून घेतल्यानंतर मुंढे यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची पाहणी केली.  नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा संक लीत करून दिला असता तर आज भांडेवाडी येथे कचऱ्याची समस्या निर्माण झाली नसती. कंपन्यांना विलग केलेला कचराच उचलण्याचे निर्देश दिले.  भांडेवाडी येथील कचऱ्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.  शहरात सुमारे एक लाख नागरिक अस्थमामुळे त्रस्त आहेत. याचा विचार करता कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रीया करण्याला प्राधान्य असल्याचे मुंढे यांनी सांगितले. लोकसहभाग व महापालिकेचे प्रयत्न यातून ही समस्या मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पदभार स्विकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुकाराम मुंढे यांनी चार कर्मचाऱ्यांना दणका दिला होता. तसेच कामात अनियमतता आढळल्याने लेखा व वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावली. तसेच सिमेंंट रस्त्यांचे काम निकृष्ट आढळल्याने कंत्राटदार व उपअभियंत्याला नोटीस बजावण्यात आली. यामुळे अधिकारी व कर्मचारी शिस्तीत आले आहेत. 

...तर नागरिकांवरही कारवाईडम्पिंग यार्डवर कचरा डम्प करताना ओला व सुका वेगळा टाकणे आवश्यक आहे. नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत करावा. अधिकारी  आणि कर्मचाºयांनी यासाठी आग्रह धरावा. त्यानंतरही नागरिक कचरा वेगेवगळा ठेवत नसतील तर त्यांच्यावरीही कारवाई केली जाईल. असा इशारा मुंढे यांनी दिला. 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे