शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

‘हाफकिन’ फार्मा कंपनी म्हणून चालवण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:58 PM

पोलिओ लस निर्मितीच्या बाबतीत जागतिक स्तरावर अग्रेसर असलेली हाफकिन इन्स्टिट्यूट ही फार्मा कंपनी म्हणून चालविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी अधिकचा निधी देऊन जागतिकस्तरावर क्रमांक एकची कंपनी बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

ठळक मुद्देअन्न व औषधी प्रशासन मंत्री गिरीश बापट यांची विधानसभेत माहिती

आॅनलाईन लोकमतनागपूर : पोलिओ लस निर्मितीच्या बाबतीत जागतिक स्तरावर अग्रेसर असलेली हाफकिन इन्स्टिट्यूट ही फार्मा कंपनी म्हणून चालविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी अधिकचा निधी देऊन जागतिकस्तरावर क्रमांक एकची कंपनी बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हाफकिन महामंडळात पोलिओ बल्क खरेदीच्या निविदा प्रक्रियेबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना बापट म्हणाले की, पोलिओ निर्मूलनासाठी लस निर्मितीच्या कामात हाफकिनचे मोठे कार्य आहे. पोलिओ बल्क खरेदीच्या निविदा प्रक्रियेत तांत्रिक मुद्यांची चौकशी करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती नेमण्यात आली असून तीन महिन्यात या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त होईल्ी, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, गणपतराव देशमुख, डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी भाग घेतला.जळगाव युनिट बंद करणार नाहीजळगाव येथील हाफकिनचे युनिट बंद करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाही, अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.सदस्य सर्वश्री डॉ. सतीश पाटील, राहुल जगताप, प्रदीप नाईक आदींनी जळगाव येथील हाफकिन युनिट बंद करण्याच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात बापट यांनी म्हटले आहे की, हाफकिन महामंडळाचे सहयोगी कंपनी असलेल्या हाफकिन अजिंठा फार्मा लिमिटेड, जि. जळगाव युनिटमध्ये केवळ क्षार संजीवनी, प्रतिजैवके, ज्वरनाशकाची औषधे, क्षयरोग औषधे, पोटदुखी व अ‍ॅलर्जीवरील औषधे यांचे उत्पादन करण्यात येते. या युनिटमध्ये पोलिओची लस अथवा इंजेक्शनचे उत्पादन केले जात नाही. हाफकिन व्यवस्थापकीय संचालक मंडळाकडून हाफकिनचे जळगाव येथील युनिट बंद करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत, असेही लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Healthआरोग्य