शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मेंदू उपचारात समान मानक आणण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 12:36 IST

रुग्णाच्या हितासाठी मेंदूच्या उपचारात समान मानक आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत प्रसिद्ध ‘न्यूरो सर्जन’ व ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स’चे (सिम्स) संचालक डॉ. लोकेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देडॉ. लोकेंद्र सिंह यांची ‘एनएसआय’च्या अध्यक्षपदी निवड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्ण गरीब असो वा श्रीमंत, त्यांना समान वैद्यकीय सेवा मिळायलाच हवी. मोठ्या रुग्णालयांच्या तुलनेत छोट्या इस्पितळांमध्ये ‘स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर’ (एसओपी) राहत नाही. यामुळे न्यूरोलॉजीच्या क्षेत्रात रुग्णांना योग्य आणि प्रभावी उपचार मिळत नाही. म्हणूनच रुग्णाच्या हितासाठी मेंदूच्या उपचारात समान मानक आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत प्रसिद्ध ‘न्यूरो सर्जन’ व ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स’चे (सिम्स) संचालक डॉ. लोकेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.‘न्यूरोलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया’च्या (एनएसआय) वर्ष २०१९ साठी अध्यक्षपदी डॉ. सिंह यांची निवड झाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.विशेष म्हणजे, हे पद पहिल्यांदाच मध्यभारतातील न्यूरोसर्जनला मिळाले आहे. ‘एनएसआय’ कार्यकारणीची वार्षिक बैठक नुकतीच जयपूर येथे झाली. यावेळी डॉ. सिंह यांची निवड करण्यात आली. ‘एनएसआय न्यूरोसर्जन्स’, ‘न्यूरोलॉजिस्ट’, ‘न्यूरो अ‍ॅनेस्थेटिस’ व ‘न्यूरो पॅथालॉजिस्ट्स’आदी पालक संघटना आहेत. ही सोसायटी जगातील पाच प्रसिद्ध संघटनापैकी एक आहे.भविष्यातील योजना आणि प्राथमिकतेवर चर्चा करताना डॉ. सिंह म्हणाले, मेंदू रोगाशी संबंधित उपचारासाठी आयसीयू, व्हेंटिलेटर, अत्याधुनिक उपकरण आदींची गरज असते. परंतु ज्या चिकित्सकांकडे ही सोय नसेल त्यांनी जबरदस्तीने रुग्णांवर उपचार करू नये. रुग्णाचा जीव धोक्यात आणू नये. अशा प्रकरणाबाबत सोसायटीच्या मदतीने जनजागृती केली जाईल.

न्यूरोसर्जन्सला देणार आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणडॉ. सिंग म्हणाले, सोसायटीच्या मदतीने युवा व नव्या न्यूरोसर्जन्सला प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी यात काही बदल करण्यात येतील. ‘शॉर्ट कोर्सेस’ चालविले जातील. ‘हँग्स आॅन वर्कशाप’ घेण्यात येतील. प्रशिक्षणाचा स्तर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न राहणार आहे.

देशात केवळ तीन हजार न्यूरोसर्जन्सडॉ. सिंह म्हणाले, मेंदूची शस्त्रक्रिया ही गुंतागुंतीची व जोखमीची असते. यामुळे विद्यार्थी हा विषय घेत नाही. देशात सध्याच्या स्थितीत २५०० ते ३००० चांगले न्यूरोसर्जन्स आहेत. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत ही फार कमी संख्या आहे. जपानच्या एकट्या टोकियो शहरातच ५५०० ते ६००० न्यूरोसर्जन्स आहेत. यामुळे सर्जन्सची संख्या वाढायला हवी.

टॅग्स :Healthआरोग्य