कामगारांच्या स्टाफ बसला ट्रकची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:07 IST2020-12-06T04:07:36+5:302020-12-06T04:07:36+5:30

काेराडी : ‘नाईट शिफ्ट’ आटाेपल्यानंतर कामगारांना घेऊन निघालेल्या स्टाफ बसला नागपूर-सावनेर मार्गावरील काेराडी नजीक माॅडर्न स्कूल टी पाॅईंटजवळ यू ...

The truck hit the staff bus | कामगारांच्या स्टाफ बसला ट्रकची धडक

कामगारांच्या स्टाफ बसला ट्रकची धडक

काेराडी : ‘नाईट शिफ्ट’ आटाेपल्यानंतर कामगारांना घेऊन निघालेल्या स्टाफ बसला नागपूर-सावनेर मार्गावरील काेराडी नजीक माॅडर्न स्कूल टी पाॅईंटजवळ यू टर्न घेताना वेगात येणाऱ्या ट्रकने जाेरात धडक दिली. त्यात बसमधील ५५ पैकी ३० कामगार जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. ५) सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

नागपूर-सावनेर महामार्गालगतच्या बाेखारा परिसरात सुंदर बिस्कीट नामक कंपनी आहे. या कंपनीत तीन ‘शिफ्ट’मध्ये काम चालते. शिवाय, कामगारांना ने-आण करण्यासाठी बसची साेय केली आहे. ‘नाईट शिफ्ट’ आटाेपल्यानंतर सकाळी ६ वाजताच्या सुमारास एमएच-४०/७४२९ क्रमांकाची बस ५५ कामगारांना घेऊन नांदा (काेराडी)च्या दिशेने निघाली. या बसमधील बहुतांश कामगार परप्रांतीय असून, ते नांदा (काेराडी) येथे राहतात. ती बस माॅडर्न स्कूल टी पाॅईंटजवळ नांदा (काेराडी)कडे जाण्यासाठी यू टर्न घेत असताना सावनेरहून नागपूरच्या दिशेने वेगात येत असलेल्या एमपी-०९/एचजी-७०३९ क्रमांकाच्या ट्रकने त्या बसला समाेरून जाेरात धडक दिली.

यात बसमधील ३० कामगार जखमी झाले. काहींच्या डाेक्याला दुखापत झाली तर काहींचे हात किंवा पाय फ्रॅक्चर झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले आणि कामगारांना बसमधून बाहेर काढत उपचारासाठी नागपूरला रवाना केले. सर्व जखमी कामगारांना नागपूर शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती केल्याची माहिती पाेलिसांनी दिली असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचेही पाेलिसांनी सांगितले. अपघात हाेताच चालकाने ट्रक घटनास्थळी साेडून पळ काढला. त्यामुळे पाेलिसांनी अपघातग्रस्त ट्रक व बस ताब्यात घेतली. याप्रकरणी काेराडी पाेलिसांनी बसचालक विलास गजभिये यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३६, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक राजेश पुकळे करीत आहेत.

----

Web Title: The truck hit the staff bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.