नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे ट्रकची धडक; तरुण-तरुणी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 14:23 IST2021-07-19T14:23:31+5:302021-07-19T14:23:53+5:30
Nagpur News नागपूर तालुक्यात असलेल्या कामठी येथे जयस्तंभ चौकात सोमवारी दुपारी सव्वा वाजता ट्रकने दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील तरुण व तरुणी जागीच ठार झाल्याची घटना घडली.

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे ट्रकची धडक; तरुण-तरुणी ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: तालुक्यात असलेल्या कामठी येथे जयस्तंभ चौकात सोमवारी दुपारी सव्वा वाजता ट्रकने दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील तरुण व तरुणी जागीच ठार झाल्याची घटना घडली.
नागपूर येथे राहणारा वैभव शंभरकर हा तरुण मोहिनी नावाच्या मुलीसोबत कामठीमार्गे कन्हानकडे जात असताना जयस्तंभ चौकात मागून येणाऱ्या ट्रकने क्र.एम.एच.४० बी एल ७४४४ ने जोरात धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की हे दोघे जागीच ठार झाले. दोघांचेही पार्थिव तपासणीसाठी कामठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून ट्रक ताब्यात घेतला आहे.