शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने दुचाकीला उडविले, एकाचा मृत्यू, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 21:46 IST

भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला धडक देत उडविले. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - सावनेर मार्गावरील वरोडा शिवारात असलेल्या वळणावर सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील वरोडा शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कळमेश्वर) : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला धडक देत उडविले. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - सावनेर मार्गावरील वरोडा शिवारात असलेल्या वळणावर सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.गणेश दाते (२४, रा. हिंगणा) असे मृताचे नाव असून, जखमी तरुणीचे नाव कळू शकले नाही. दोघेही एमएच-४०/एएल-५१६९ क्रमांकाच्या मोटरसायकने कळमेश्वरहून सावनेरला जात होते. ते वरोडा शिवारातील वळणावर पोहोचताच सावनेरहून कळमेश्वरकडे वेगात येणाºया ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली आणि निघून गेला.त्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी त्यांना कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णलयात आणले. तिथे डॉक्टरांनी गणेशला मृत घोषित केले तर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीवर प्रथमोपचार करून तिला नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था केली. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.दहा दिवसात नऊ जण ठारवरोडा शिवारातील ‘ते’ वळण कर्दनकाळ ठरले आहे. कारण त्या वळणावर गेल्या दहा दिवसातील हा तिसरा अपघात होय. तिन्ही घटनांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून, दहा जण जखमी झाले. या ठिकाणी २० सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जखमी झाले. दुसºया दिवशी २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले होते. त्यानंतर सोमवारी (दि. १) झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तरुणी जखमी झाली.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर