शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी - सावनेर मार्गावर ट्रकने मोटरसायकलवरील दोघांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 18:53 IST

भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या  मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारशिवनी - सावनेर मार्गावरील निंबा शिवारात सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनववर्षाच्या पार्टीने केला घातमृत जीवलग मित्र : निंबा शिवारातील घटना

आॅनलाईन लोकमतनागपूर : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या  मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारशिवनी - सावनेर मार्गावरील निंबा शिवारात सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.राजेंद्र रामाजी वाहाने (४५, रा. चिचोली) व फुलसिंग सांडिले (५०, रा. कोथुळणा, ता. सावनेर) अशी मृतांची नावे आहेत. राजेंद्र व फुलसिंग हे मित्र असून,ते दोघेही निंबा येथे त्यांचा मित्र मंगेश मेश्राम यांच्याकडे नववर्षानिमित्त आले होते. राजेंद्र वाहाने हे फुलसिंग यांना कोथुळणा येथे घरी पाहोचून देण्यासाठी एमएच-४०/एडब्ल्यू-४५०५ क्रमांकाच्या मोटरसायकलने निंब्याहून निघाले. ते दोघेही गावापासून काही अंतरावर जाताच सावनेरहून पारशिवनी मार्गे रामटेककडे भरधाव जाणाऱ्या  एमपी-०९/एएफ-५२६२ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघात होताच ट्रकचालकाने ट्रक सोडून घटनास्थळाहून पळ काढला. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाय, पारशिवनी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी ट्रकचालाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध घेणे सुरू केले आहे. या घटनेचा तपास ठाणेदार प्रमोद डेकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर