शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  पारडीत ट्रकने मुलाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 01:11 IST

काकाच्या जन्मदिनाच्या पार्टीतून परत येणाऱ्या एक मुलाला ट्रकने चिरडले. ही घटना मंगळवारी रात्री कळमना पारडी बाजारात घडली. घटनेत मुलासह भाऊ आणि काका जखमी झाले.

ठळक मुद्दे जड वाहनांवर नियंत्रण आणावे : नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काकाच्या जन्मदिनाच्या पार्टीतून परत येणाऱ्या एक मुलाला ट्रकने चिरडले. ही घटना मंगळवारी रात्री कळमना पारडी बाजारात घडली. घटनेत मुलासह भाऊ आणि काका जखमी झाले.दहा वर्षीय मृत मुलाचे नाव नैतिक करताल सनोडिया असून, तो भांडेवाडी पारडी येथील रहिवासी होता. जखमींमध्ये राकेश सनोडिया (२४) आणि दुग्गु सनोडिया (४) यांचा समावेश आहे. राकेश मंगळवारी रात्री दोन पुतण्यांसह सोनबानगर येथे आयोजित जन्मदिवसाच्या पार्टीत गेले होते. पार्टीनंतर तिघे रात्री १०.३० वाजता दुचाकीवरून घरी परत येत होते. पारडी बाजार पुलाजवळ पाठीमागून येणारा ट्रक क्र. ए.पी./२५/यू/६०३५ च्या चालकाने मोटरसायकलला धडक दिली. तिघेही खाली पडले. ट्रकचे चाक नैतिकच्या डाव्या पायावरून गेले. तिघांना रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे नैतिक मृत पावला. या घटनेने या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी सांगितले की, या मार्गावर जड वाहनांमुळे निरंतर अपघात होतात. जड वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. नैतिक चौथ्या वर्गात होता. त्याचे वडील ट्रकचालक आहेत. या घटनेत भाऊ आणि काका बचावले. कळमना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू