झोपेचा फायदा घेऊन ट्रॉलीबॅग पळविली

By Admin | Updated: May 3, 2014 16:43 IST2014-05-03T13:23:37+5:302014-05-03T16:43:42+5:30

झोपेत असल्याचा फायदा घेऊन पुरी-जोधपूर एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या दाम्पत्याची १७ हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली ट्रॉलीबॅग पळविल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Trolleybag grabbed the benefit of sleepy | झोपेचा फायदा घेऊन ट्रॉलीबॅग पळविली

झोपेचा फायदा घेऊन ट्रॉलीबॅग पळविली

झोपेचा फायदा घेऊन ट्रॉलीबॅग पळविली
नागपूर : झोपेत असल्याचा फायदा घेऊन पुरी-जोधपूर एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या दाम्पत्याची १७ हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली ट्रॉलीबॅग पळविल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संजय किशोर सहारे (३३) रा. शिवशक्तीनगर, पो. उत्पलवाडी, कामठी रोड नागपूर हे रेल्वेगाडी क्रमांक १८४७३ पुरी-जोधपूर एक्स्प्रेसच्या एस ४ ने प्रवास करीत होते. बर्थ क्रमांक १५ खाली त्यांनी आपली लाल रंगाची ट्रॉलीबॅग ठेवली होती. रायपूर रेल्वेस्थानक येण्यापूर्वी ते झोपेतून जागे झाले असता त्यांना आपली ट्रॉलीबॅग दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली मात्र ट्रॉलीबॅग आढळली नाही. त्यात सोन्याची ५ ग्रॅमची १३ हजार रुपये किमतीची चेन, महत्त्वाचे कागदपत्र आणि ४ हजार रुपयांचे कपडे असा एकूण १७ हजाराचा मुद्देमाल होता. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Trolleybag grabbed the benefit of sleepy