शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

त्रिभाषा धोरण निश्चिती समिती शुक्रवारी येणार नागपुरात; मते मांडण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

By आनंद डेकाटे | Updated: October 8, 2025 20:11 IST

नागरिक आणि विविध क्षेत्रातील तज्ञांची मते जाणून घेणार : नियोजन भवन येथे दिवसभर संवाद साधणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चा अनुषंगाने राज्यात त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ही त्रिभाषा धोरण निश्चित समिती येत्या शुक्रवारी १० आक्टोबर रोजी नियोजन भवन येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व मान्यवरांशी संवाद साधण्यासाठी व त्यांची मते जाणून घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

समिती सदस्यांमध्ये भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे (एनएसडी) संचालक डॉ. वामन केंद्रे ,शिक्षणतज्ज्ञ डॉ. अपर्णा मॉरिस, पुण्याच्या डेक्कन काॅलेजच्या भाषा विज्ञान प्रमुख सोनाली कुलकर्णी जोशी, शिक्षणतज्ज्ञ डॉ. मधुश्री सावजी, बालमानसतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल, तर राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा अभियान, मुंबईचे संजय यादव हे सदस्य सचिव आहेत. ही समिती १० ऑक्टोबर रोजी नागपूर विभागातील राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, शिक्षण तज्ज्ञ, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पालक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, विचारवंत व आंदोलक यांची मते जाणून घेण्याकरिता नागपूर येथे दौऱ्यावर आहेत.

तरी राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, शिक्षण तज्ज्ञ, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पालक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, विचारवंत व आंदोलक यांना राज्यात शालेय स्तरावर त्रिभाषा सूत्रबाबत समिती समोर मते, विचार व्यक्त करण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच नागरिकांकरिता आपली मते, विचार व्यक्त करण्याकरिता समितीच्या Website :- tribhashasamiti.mahait.org संकेतस्थळावर सुध्दा व्यवस्था करण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tri-Language Policy Committee to Visit Nagpur, Seeking Public Input

Web Summary : The committee, led by Dr. Jadhav, will visit Nagpur on October 10th to gather opinions on the implementation of the tri-language policy in schools. They invite educators, leaders, and citizens to share their views. Opinions can also be submitted online.
टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र