वीर भाई कोतवाल यांना आदरांजली ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST2020-12-02T04:12:42+5:302020-12-02T04:12:42+5:30
नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने वीर हुतात्मा भाई कोतवाल यांना आदरांजली वाहण्यात आली. विदर्भ विभागीय अध्यक्ष श्याम आस्करकर यांच्या ...

वीर भाई कोतवाल यांना आदरांजली ()
नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने वीर हुतात्मा भाई कोतवाल यांना आदरांजली वाहण्यात आली. विदर्भ विभागीय अध्यक्ष श्याम आस्करकर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात रेशीमबाग चौकातील वीर भाई कोतवाल स्मारकाच्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष गणपतराव चौधरी यांच्या हस्ते माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महिला अध्यक्ष अर्चना कडू, चेतना मिराशे,वनिता जाधव यांच्यासह जिल्हा व विभाग शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.
तर अन्य दुसऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय वाटकर यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर यांच्या हस्ते माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विदर्भ उपाध्यक्ष प्रकाश द्रवेकर, संत नगाजी महाराज मठाचे सचिव रमेश चौधरी, श्याम चौधरी, सतीश फोपसे, आनंद आंबुलकर, रमेश विंचुरकर, उत्तम दवलेकर आदी उपस्थित होते.