युवा सेनेचा कार्यक्रम : कार्यकर्त्यांची उपस्थितीवाडी : पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भंडारातील अग्नितांडवात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनाप्रणीत युवा सेनेच्यावतीने वाडी येथे करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे बांधकाम सभापती हर्षल काकडे होते. प्रमुख अतिथी म्हणून डिफेन्सचे कामगार नेते पी.के. मोहनन, माजी सैनिक संघटनेचे सकलानी, माजी सभापती रूपेश झाडे, किताबसिंह चौधरी, प्रा. सुभाष खाकसे उपस्थित होते. यावेळी मेणबत्त्या प्रज्वलित करून तसेच मौन धारण करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला विजय मिश्रा, अखिल पोहनकर, संतोष केशरवानी, सुनील मंगलानी, शुभम ठवरे, किसन बांते, सुनील बनकोटी, दिवाण रहांगडाले, अजय चौधरी, क्रांती सिंह, पिंटू पोहनकर, रणजित सनसरे, सचिन बोंबले, लकी सिंह, संदीप उमरेडकर, विकास तारेकर, प्रल्हाद लाडे यांच्यासह युवा सेना, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अग्नितांडवातील शहिदांना श्रद्धांजली
By admin | Updated: June 4, 2016 02:58 IST