शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

एसटीच्या दरवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:38 AM

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या प्रवास भाड्यात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असून पेट्रोलच्या दरवाढीमुळे आधीच त्रस्त झालेल्या प्रवाशांना प्रवासात अधिक पैसे मोजण्याची पाळी येणार आहे.

ठळक मुद्दे१८ टक्के दरवाढीचा फटका : प्रवासात मोजावे लागणार अधिकचे पैसे

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या प्रवास भाड्यात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असून पेट्रोलच्या दरवाढीमुळे आधीच त्रस्त झालेल्या प्रवाशांना प्रवासात अधिक पैसे मोजण्याची पाळी येणार आहे.एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित असल्यामुळे प्रवासी एसटीच्या प्रवासाला पसंती देतात. अलिकडच्या काळात एसटी महामंडळाने प्रवाशांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविल्यामुळे एसटीच्या प्रवाशांची संख्याही वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. परंतु परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १५ जूनपासून एसटीच्या भाड्यात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सर्व सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. एसटी महामंडळात सहा किलोमीटरचा एक टप्पा असा हिशेब करण्यात येतो. त्यानुसार सध्या एसटी महामंडळाकडून प्रति सहा किलोमिटरसाठी ६ .३० रुपये आकारण्यात येतात. १८ टक्के दरवाढीच्या निर्णयानंतर प्रति ६ किलोमिटरसाठी ७.४५ रुपये आकारण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवासभाड्यापोटी अधिक रक्कम मोजण्याची पाळी येणार आहे. नागपुरातून काही प्रमुख शहरात जाणाऱ्या एसटीच्या बसेसचे प्रवासभाडे पुढील प्रमाणे राहील.नागपुरातून काही प्रमुख शहरांचे भाडेसध्याचे भाडे           दरवाढीनंतरचे भाडेचंद्रपूर १६५               १९५यवतमाळ १५९           १९०वर्धा ८९                    १०५अकोला २७८           ३३०अमरावती १६५        १९५भंडारा ७०                ८५उमरेड ५१                ६०काटोल ६४              ७५रामटेक ५८              ७०सावनेर ४५              ५५ 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळFairजत्रा