लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे वेगात जात असलेल्या ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने रोडच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्ती ट्रकवर मागून धडकली. धडक एवढी जबरदस्त होती की, ट्रॅव्हल्सचा दर्शनी भाग अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात ट्रॅव्हल्समधील पाच जणांना घटनास्थळीच मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले. मृतांमध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह एका महिलेचा समावेश आहे. त्यातील तिघे अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - गडचिरोली महामार्गावरील उमरेड नजीकच्या उदासा शिवारात मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.मृतांमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी कीर्ती सुरेशसिंग चौरे (३२, रा. कोल्हारी), रामदास सीताराम मडावी (५५, रा. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर), संजय रामटेके, रा. भुयार यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे. त्या दोघांची नावे कळू शकली नाही. जखमींमध्ये लक्ष्मीकांत वामन लोढे (२९, रा. रत्नापूर), गीता के. झोडे (३५, रा. मकरधोकडा), विनोद मारोती ढोक (३७, रा. रत्नापूर), रागिनी व्ही. चहांदे (१९, रा. तुकूम), सुनील एस. डेकाटे (४५, रा. रत्नापूर), परसराम जे. पराते (४०, रा. भिवापूर), शैलेश बी. विजयकर, रा. सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर, राहुल एस. तायडे (२६, रा. सिंदेवाही), शुभांगी देवीदास राऊत (२४, रा. तुकूम), आकाश ठवकर (२६), लक्ष्मण चहांदे (३०), जयप्रकाश सायरे (३५, रा. कामठी), चंद्रा तिकारे (२५, रा. अंतरगाव), गायत्री तिकारे (२३, रा. अंतरगाव), अमर मांढरे (६५, रा. सावरगाव), प्रियंका बनवारे (२३, रा. रमावा) यांच्यासह अन्य तीन जणांचा समावेश आहे. त्या तीन जणांची नावे कळू शकली नाहीत.हे सर्व जण नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे जाणाऱ्या एमएच-३४/ए-८४७५ क्रमांकाचा ट्रॅव्हल्सने प्रवास करीत होते. दुसरीकडे, उदासा शिवारात एमएच-४०/एके-२३४४ क्रमांकाच्या ट्रक चाक पंक्चर झाल्याने रोडच्या कडेला उभा होता. दरम्यान, वेगात असलेली ट्रॅव्हल्स त्या ट्रकच्या मागच्या भागावर धडकली. त्यात ट्रॅव्हल्सचा दर्शनी भाग चक्काचूर झाला. शिवाय, ट्रॅव्हल्समधील पाच जणांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले. माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले व सर्व जखमींला लगेच उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूरला रवाना करण्यात आले. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
ट्रॅव्हल्स बस ट्रकवर धडकली : भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 23:41 IST
नागपूरहून सिंदेवाही (जिल्हा चंद्रपूर) येथे वेगात जात असलेल्या ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने रोडच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्ती ट्रकवर मागून धडकली. धडक एवढी जबरदस्त होती की, ट्रॅव्हल्सचा दर्शनी भाग अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात ट्रॅव्हल्समधील पाच जणांना घटनास्थळीच मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले. मृतांमध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह एका महिलेचा समावेश आहे. त्यातील तिघे अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - गडचिरोली महामार्गावरील उमरेड नजीकच्या उदासा शिवारात मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
ट्रॅव्हल्स बस ट्रकवर धडकली : भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील उमरेड मार्गावरील उदासा शिवारातील घटना