क्रांतिभूमी ते दीक्षाभूमी सायकलने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 18:56 IST2021-11-10T18:55:45+5:302021-11-10T18:56:18+5:30
Nagpur News पुण्याचे अतुल चव्हाण यांनी पुणे परिसरातील भीमा कोरेगावच्या क्रांतिस्तंभास मानवंदना अर्पण करून सायकलने पाच दिवसात नागपूर गाठले.

क्रांतिभूमी ते दीक्षाभूमी सायकलने प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुण्याचे अतुल चव्हाण यांनी पुणे परिसरातील भीमा कोरेगावच्या क्रांतिस्तंभास मानवंदना अर्पण करून सायकलने पाच दिवसात नागपूर गाठले.
मूळ फिटनेसचे कोच असलेले अतुल चव्हाण यांची मागील अनेक वर्षांपासून नागपूरच्या दीक्षाभूमीला सायकलनेच भेट देण्याची इच्छा होती. मागील दोन वर्षे कोविडमुळे त्यांना फिरणे शक्य नव्हते. परंतु यावर्षी त्यांनी सायकलने दीक्षाभूमीवर येण्याचे निश्चित केले. ते ५ नोव्हेंबरला पुण्यातून नगरमार्गे निघाले. शेवगाव, कारंजा लाड, कळम येथे मुक्काम करीत - करीत ते मंगळवारी नागपुरातील दीक्षाभूमीवर पोहोचले.
दीक्षाभूमीवर बसपा नेते उत्तम शेवडे, सदानंद जामगडे, प्रवीण पाटील, प्रकाश फुले व सिद्धार्थ म्हैसकर यांनी त्यांचे स्वागत केले. अतुल चव्हाण यांनी यापूर्वी पुणे ते गोवा सायकलने प्रवास केला होता.