शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स-ऑल्टो कारचा भीषण अपघात, २ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 20:04 IST

सुसाट वेगातील ट्रॅव्हल्स व ऑल्टो कारच्या भीषण अपघातात मंत्रालयातील सेवानिवृत्त कृृषी उपसचिवासह ट्रॅव्हल्स मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपूर-भिवापूर राष्ट्रीय मार्गावरील रानमांगली शिवारात हा अपघात झाला. अपघात इतका भयावह होता की ट्रॅव्हल्स मालक ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली सापडला होता तर उपसचिवाचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही वेळ राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. ट्रॅव्हल्समधील इतर प्रवासी मात्र सुखरूप आहेत.

ठळक मुद्देमृतांमध्ये सेवानिवृत्त कृषी उपसचिव आणि ट्रॅव्हल्स मालकाचा समावेशनागपूर-भिवापूर मार्गावरील रानमांगली शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (भिवापूर ): सुसाट वेगातील ट्रॅव्हल्स व ऑल्टो कारच्या भीषण अपघातात मंत्रालयातील सेवानिवृत्त कृृषी उपसचिवासह ट्रॅव्हल्स मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपूर-भिवापूर राष्ट्रीय मार्गावरील रानमांगली शिवारात हा अपघात झाला. अपघात इतका भयावह होता की ट्रॅव्हल्स मालक ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली सापडला होता तर उपसचिवाचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही वेळ राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. ट्रॅव्हल्समधील इतर प्रवासी मात्र सुखरूप आहेत.मृतांमध्ये अशोक तानबाजी उईके (५८) रा. सानपाडा, मुंबई (मूळ गाव वर्धा) व ट्रॅव्हल्स मालक पंकज लक्ष्मण खापर्डे (३५) रा. ब्रम्हपुरी यांचा समावेश आहे. मृत अशोक उईके हे मंत्रालयातील कृषी विभागात उपसचिव म्हणून काही महिन्यांपूर्वीच सेवानिवृत्त झाल्याचे कळते. प्राप्त माहितीनुसार ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ३४ बीजी ४२५२ ही भरधाव वेगात गडचिरोलीकडून नागपूरकडे जात होती. दरम्यान, चालकाचे नियंत्रण बिघडल्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या आॅल्टो कार क्रमांक एमएच ४९ बीबी ०६६७ ला जबर धडक दिली. यात ऑल्टो कारच्या दर्शनीभागाचा चुराडा झाला. यात कार चालक अशोक उईके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कारला धडक दिल्यानंतर ट्रॅव्हल्सने रस्ता सोडून कडेला असलेल्या विद्युत खांबांना धडक दिली. दरम्यान, ट्रॅव्हल्सच्या दारात उभा असलेला ट्रॅव्हल्सचा मालक पंकज खापर्डे बाहेर फेकल्या गेला. अशात ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली सापडल्यामुळे त्याचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. याप्रकरणी भिवापूर पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध भादंविच्या २७९,३०४, आरडब्ल्यू १८४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू