एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ प्रवास १० रुपयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:54 IST2021-02-05T04:54:44+5:302021-02-05T04:54:44+5:30

महा मेट्रो, नागपूर महानगरपालिका व मिहान इंडिया लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळावर जाण्यासाठी बस उपलब्ध करून ...

Travel from Airport Metro Station to Airport at Rs | एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ प्रवास १० रुपयात

एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ प्रवास १० रुपयात

महा मेट्रो, नागपूर महानगरपालिका व मिहान इंडिया लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळावर जाण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी फक्त १० रुपये प्रवास भाडे आकारण्यात येईल. ही बस इलेक्ट्रिक असून त्यात सामान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंत १० रुपये तिकीट दर आहे. तसेच एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळावर बसचे १० रुपये या प्रमाणे सीताबर्डी येथून विमानतळावर जाण्यासाठी केवळ २० रुपये लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी मेट्रो रेल्वे तसेच बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महा मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे.

...........

महा मेट्रोतर्फे फिडर बस व्यवस्था

-खापरी मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी (एमआयडीसी गेट)

-खापरी मेट्रो स्टेशन ते एम्स हॉस्पिटल

-लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा शासकीय हॉस्पिटल

-जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन ते जयताळा

-जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन ते म्हाळगीनगर

-एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन ते बेलतरोडी

-जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन ते बेलतरोडी

............

Web Title: Travel from Airport Metro Station to Airport at Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.