लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशात पाठविलेल्या लोखंडी सळ्यांतील चोवीस लाखांचा माल मधेच लंपास करून ट्रान्सपोर्ट आणि त्याच्या साथीदारांनी दगाबाजी केली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या या फसवणुकीच्या घटनेप्रकरणी तब्बल पाच महिन्यानंतर अर्थात रविवारी याप्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.प्रसाद रामचंद्र अग्निहोत्री (वय ४७, रा. महाकाली नगर, मानेवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रायसोनी ग्रुपच्या नवीन महाविद्यालयाचे बांधकाम मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसर सायखेडा येथे सुरू आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून या बांधकामस्थळी नागपुरातून विविध प्रकारचे साहित्य नियमित पाठविले जाते. ३ जानेवारी रोजी नागपुरातून लकडगंज भागातील एका स्टील व्यापाऱ्याकडून अग्निहोत्री यांनी मोठ्या प्रमाणात लोखंडी सळ्या विकत घेतल्या आणि त्या रियाज नामक ट्रान्सपोर्टमार्फत ट्रकने सायखेडा मध्य प्रदेश येथे पाठविल्या. काही दिवसानंतर सायखेडा येथील रायसोनी ग्रुपच्या व्यक्तीचा अग्निहोत्री यांना फोन आला. तुम्ही पाठवलेल्या लोखंडी सळ्यांपैकी २४ लाख रुपये किमतीच्या लोखंडी सळ्या कमी असल्याचे त्याने अग्निहोत्री यांना सांगितले. अग्निहोत्री यांनी यासंदर्भात ट्रान्सपोर्टर रियाजला विचारणा केली. रियाजने ट्रकचालक आणि क्लीनरकडे बोट दाखवून आपण त्यांना विचारणा करतो, तुम्ही चिंता करू नका, असे सांगितले. त्यानंतर बरेच दिवस सेटल करून देण्याच्या नावाखाली त्याने टाळाटाळ केली. पाच महिने होऊनही त्याने चोवीस लाखांच्या लोखंडी सळ्या परत करण्याची अथवा रक्कम परत करण्याचे सौजन्य दाखवले नाही. तो नुसता टाळाटाळ करीत होता. ट्रान्सपोर्टरने त्याच्या ट्रकचालक तसेच क्लीनरसोबत संगनमत करून फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे अग्निहोत्री यांनी कळमना पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणी रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी ट्रान्सपोर्टर, ट्रकचालक आणि क्लीनरचा शोध घेतला जात आहे.
नागपुरात ट्रान्सपोर्टरकडून दगाबाजी :२४ लाखांचे लोखंड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 19:49 IST
मध्य प्रदेशात पाठविलेल्या लोखंडी सळ्यांतील चोवीस लाखांचा माल मधेच लंपास करून ट्रान्सपोर्ट आणि त्याच्या साथीदारांनी दगाबाजी केली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या या फसवणुकीच्या घटनेप्रकरणी तब्बल पाच महिन्यानंतर अर्थात रविवारी याप्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नागपुरात ट्रान्सपोर्टरकडून दगाबाजी :२४ लाखांचे लोखंड लंपास
ठळक मुद्देकळमन्यात गुन्हा दाखल