शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जपान, फ्रान्सच्या मदतीतून होणार नागपुरातील नद्यांचा कायापालट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:48 IST

नागनदीच्या प्रदूषण निर्मूलनाच्या १२५२.३३ कोटींच्या प्रकल्पासाठी जपानकडून, तर नागनदी दर्शनी भाग विकासाच्या १६०० कोटींच्या प्रकल्पासाठी फ्रान्सकडून अर्थसाहाय्य मिळणार आहे.

- गणेश हूडनागपूर : शहरातील नागनदीच्या प्रदूषण निर्मूलनाच्या १२५२.३३ कोटींच्या प्रकल्पासाठी जपानकडून, तर नागनदी दर्शनी भाग विकासाच्या १६०० कोटींच्या प्रकल्पासाठी फ्रान्सकडून अर्थसाहाय्य मिळणार आहे. यातून नदीचा कायापालट होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.नद्या प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जायका) ८५ टक्के निधी कर्ज स्वरुपात देणार आहे. प्रकल्पाचे निरीक्षण करण्यासाठी जपानचे तांत्रिक पथक नागपूर दौऱ्यावर आले आहे. मे अखेरीस आपला तांत्रिक अहवाल सादर करतील. या प्रकल्पामुळे नाग नदी, पिवळी नदी व बोरनाल्याला नवसंजीवनी मिळणार आहे.नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प राबविल्यानंतर फ्रान्सच्या मदतीने नागनदी दर्शनी भागाचा विकास (नागनदी रिव्हर फ्रन्ट डेव्हलपमेंट) प्रकल्प राबविला जाणार आहे. १६०० कोटींचा हा प्रकल्प फ्रान्स सरकारच्या निधीतून राबविला जाईल. फ्रान्सच्या एएफडी तांत्रिक संस्थेने देशातील तीन शहरांची निवड केली आहे. यात चंदीगड, पॉन्डेचरी व नागपूरचा समावेश आहे. एएफडीने प्रकल्पाचा तांत्रिक अहवाल सादर केला आहे. अंतिम मास्टर प्लान मार्च अखेरपर्यंत सादर केला जाणार आहे. यात पूर नियंत्रण, नदी किनाऱ्याच्या दोन्ही बाजूचा विकास, नदी काठावरील झोपडपट्टीचे पुनर्वसन व अर्बन ट्रान्सपोर्टेशन आदीचा समावेश आहे.आचारसंहिता संपताच प्रकल्पाला सुरुवातराष्ट्रीय नद्या संवर्धन योजने(एनआरसीपी)ची मंजुरी घेऊ न महापालिका हा प्रकल्प राबविणार आहे. यासाठी केंद्र, राज्य सरकार व महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच प्रकल्पाचे काम सुरू होईल, अशी माहिती नद्या व सरोवरे विभागाचे उपअभियंता मोहम्मद इसराईल यांनी दिली.

टॅग्स :riverनदीnagpurनागपूर