तृतीयपंथीयांनी वाहिली चमचमला भावपूर्ण श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:32 IST2019-06-17T23:30:45+5:302019-06-17T23:32:51+5:30
तृतीयपंथीय चमचम हिची नुकतीच हत्या करण्यात आली. तिच्या हत्येमुळे तृतीयपंथीयांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सोमवारी संविधान चौकात तृतीयपंथीय हक्क समिती आणि सारथी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चमचम हिला श्रद्धांजली देण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कॅन्डल मार्चही काढण्यात आला. यावेळी शेकडोच्या संख्येत तृतीयपंथीय, ट्रान्सजेंडर, गे, लिस्बियन व कार्यकर्त्यांनी चमचमला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

तृतीयपंथीयांनी वाहिली चमचमला भावपूर्ण श्रद्धांजली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तृतीयपंथीय चमचम हिची नुकतीच हत्या करण्यात आली. तिच्या हत्येमुळे तृतीयपंथीयांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सोमवारी संविधान चौकात तृतीयपंथीय हक्क समिती आणि सारथी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चमचम हिला श्रद्धांजली देण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कॅन्डल मार्चही काढण्यात आला. यावेळी शेकडोच्या संख्येत तृतीयपंथीय, ट्रान्सजेंडर, गे, लिस्बियन व कार्यकर्त्यांनी चमचमला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी राणी किन्नर यांच्या नेतृत्वात नारे-निदर्शने करण्यात आली. तसेच चमचमच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी, तृतीयपंथीय व ट्रान्सजेंडर समूहाच्या हक्काचे हनन करण्यात येऊ नये, तृतीयपंथीय, ट्रान्सजेंडर, गे, लिस्बियन यांच्याकरिता सुरक्षा समिती गठित करण्यात यावी, आदी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी सारथी ट्रस्टचे आनंद चांदरानी. कुणाल, निकुंज जोशी यांच्यासह इतर पदाधिकारी व बहुसंख्येत तृतीयपंथीय उपस्थित होते.