शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

रेल्वेगाड्यात वाढला तृतीयपंथीयांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 10:09 PM

रेल्वेगाड्यात तृतीयपंथीयांची संख्या वाढली असून ते प्रवाशांकडून जबरदस्तीने वसुली करीत असल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना होत असलेला त्रास दूर करण्यासाठी तृतीयपंथीयांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना त्रास : जबरदस्तीने करतात वसुली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेगाड्यात तृतीयपंथीयांची संख्या वाढली असून ते प्रवाशांकडून जबरदस्तीने वसुली करीत असल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना होत असलेला त्रास दूर करण्यासाठी तृतीयपंथीयांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.नागपूर रेल्वेस्थानकाच्या आऊटरकडील भागातून तृतीयपंथी रेल्वेगाडीत चढतात. जनरल आणि स्लीपर क्लासमधील प्रवाशांकडून ते जबरदस्तीने वसुली करतात. एखाद्या प्रवाशाने पैसे देण्यास नकार दिल्यास ते शिव्याशाप देऊन अर्वाच्च भाषा वापरतात. नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज १३५ ते १५० रेल्वेगाड्या ये-जा करतात. नागपूर रेल्वेस्थानकावरून गाडी सुटल्यानंतर आणि रेल्वेस्थानकावर गाडी येताना आऊटरकडील भागात गाडीचा वेग कमी असतो. याचा फायदा घेऊन तृतीयपंथी गाडीत चढतात. त्रिवेंद्रम-गोरखपूर, राप्तीसागर एक्स्प्रेस, जीटी एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस, हावडा-कुर्ला एक्स्प्रेस, मुंबई मेल, विदर्भ एक्स्प्रेस या गाड्यात तृतीय पंथींयांची संख्या अधिक असते. वसुली झाल्यानंतर ते आऊटरकडील भागात गाडीचा वेग कमी होताच गाडीखाली उतरतात. रेल्वेगाड्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांचा बंदोबस्त असतानाही या तृतीयपंथीयांचा बंदोबस्त होताना दिसत नाही. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने आऊटरकडील भागात बंदोबस्त लावून तृतीयपंथीयांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.तृतीयपंथीयांसाठी पथकाची नेमणुक‘तृतीयपंथीयांकडून रेल्वेगाड्यात प्रवाशांना होत असलेला त्रास लक्षात घेता रेल्वे सुरक्षा दलाने पथकाची नेमणूक केली आहे. पथकातील आरपीएफ जवानांना तृतीयपंथीयांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात येईल.’भवानी शंकर नाथ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल

टॅग्स :railwayरेल्वेTransgenderट्रान्सजेंडर