शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिका-यांच्या बदल्या

By admin | Updated: January 9, 2017 21:44 IST

नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक एस. आर. शेलार यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या बदलीसोबतच नागपूर ग्रामीणचे नवीन पोलीस अधीक्षक

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 09 -  नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक एस. आर. शेलार यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या बदलीसोबतच नागपूर ग्रामीणचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून शैलेष बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एसपी आणि डीआयजी दर्जाच्या पाच अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी सायंकाळी गृहविभागाने जारी केले. त्यात महत्वपूर्ण मानल्या जाणा-या नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख (आयजी, एएनओ) शेलार यांचाही समावेश आहे. आतापर्यंत हे पद गडचिरोली-गोंदीया परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शिवाजीराव बोडखे यांच्याकडे होते. शेलार अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. 
दुसरी महत्वाची नियुक्ती नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाची आहे. येथील अनंत रोकडे यांना राज्य गुन्हे अण्वेषण विभागात (पुणे) अधीक्षक म्हणून स्थानांतरीत करून त्यांच्या जागी लोहमार्ग पोलीस अधीक्षक शैलेष बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली. शहर पोलीस आयुक्तानंतर मानाचे पद म्हणून पोलीस दलात नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पदाकडे बघितले जाते. बलकवडे यांनी नागपूर पोलीस आयुक्तालयात परिमंडळ १ चे उपायुक्त, उपायुक्त प्रशासन अशा जबाबदा-या सांभाळल्या आहेत. चांगले काम असूनही बलकवडे यांना साईडलाईन करण्यात आले होते. दरम्यान, या नियुक्तीमुळे त्यांना न्याय मिळाल्याची भावना स्थानिक पोलीस अधिका-यांमधून  व्यक्त होत आहे.  बलकवडे यांच्या रिक्त पदावर साहेबराव पाटील यांची वर्णी लावण्यात आली. पाटीलही अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते.