शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident News : 'बाळा'च्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले; दुसऱ्याचे लॅबला पाठवले, डॉक्टरांचे बिंग फुटले
2
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
3
शरद पवारांचे २ युवा शिलेदार अजित पवारांकडे; 'तुतारी' खाली ठेवत हाती 'घड्याळ' बांधणार
4
उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपचे कुठे आणि किती नुकसान? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
5
Pune Porsche Accident News इतर लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग केल्यावर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती
6
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
7
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
8
"भाजपा १५० च्या वर जाणार नाही", माजी केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा
9
IPL संपताच जय शाह यांची मोठी घोषणा; Ground Staff कर्मचाऱ्यांना मिळाले मोठे बक्षीस
10
जादू की झप्पी! जवळच्या व्यक्तीला मिठी मारा अन् 'या' आरोग्यविषयक तक्रारींपासून राहा दूर
11
Pune Porsche Accident News रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
12
गौतम गंभीर तर आहेच... पण, कोलकाता नाईट रायडर्सच्या चॅम्पियन बनण्याच्या प्रवासातील हेही शिलेदार
13
Fact Check: PM मोदींनी रॅलीत ‘अपशब्द’ वापरले नाहीत; व्हायरल व्हिडिओ फेक, जाणून घ्या सत्य
14
अश्विनी कासारला लोकलमध्ये महिलेने मारली लाथ, पोलिसांना टॅग करत शेअर केला व्हिडिओ
15
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
16
Mukesh Ambani News : मुकेश अंबानींची 'या' देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीवर नजर, पाहा काय आहे प्लान?
17
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
18
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
19
Pune Porsche Accident News पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर 'बाळा'चे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
20
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा

तृतीयपंथीयातील वाद विकोपाला : चमचमवर सेनापती उत्तमबाबाचा प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 9:36 PM

नेतृत्वाच्या मुद्यावरून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांच्या दोन गटातील वादाला मंगळवारी हिंसक वळण मिळाले. सेनापती म्हणून ओळखला जाणाऱ्या तृतीयपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील तृतीयपंथी चमचमवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाली. कळमन्यातील कामनानगरात मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देनागपुरातील कळमना भागात प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नेतृत्वाच्या मुद्यावरून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांच्या दोन गटातील वादाला मंगळवारी हिंसक वळण मिळाले. सेनापती म्हणून ओळखला जाणाऱ्या तृतीयपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील तृतीयपंथी चमचमवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाली. कळमन्यातील कामनानगरात मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. 

नागपूर-विदर्भाच्या तृतीयपंथीयांच्या गटाची गादी उत्तमबाबा काही वर्षांपासून सांभाळतो आहे. त्याच्या नेतृत्वाला तृतीयपंथीयांच्याच दुसऱ्या एका गटाचा तीव्र विरोध आहे. या विरोधामुळे उत्तर नागपुरात दोन्ही गटांकडून परस्परांवर हल्ले, एकमेकांना धमक्या देणे आदी प्रकार घडले आहेत. दोन वर्षांपूर्वी उत्तमबाबाने विरोधी गटातील तृतीयपंथीयांवर फायरिंगही केले होते. तर, विरोधी गटाने वर्षभरापूर्वी जोरदार हल्ला चढवून त्याला मारहाणही केली होती.  

पाचपावली, लकडगंज, वर्धमाननगर, जरीपटका, तहसील आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन्ही गटांनी परस्परांविरोधात अनेक तक्रारी नोंदविल्या आहेत. त्यांच्यातील हाणामाऱ्या आता नेहमीचाच प्रकार झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून या दोन गटातील धुसफूस पुन्हा तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी दुपारी अडीच वाजता उत्तमबाबाने त्याच्या साथीदारांसह कळमन्यातील कामनानगरात राहणाºया चमचम गजभियेच्या घरी जाऊन चमचमवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाले. दरम्यान, बाजूची मंडळी धावली आणि त्यांनी उत्तमबाबा तसेच साथीदाराला आवरले. गंभीर जखमी झालेल्या चमचमला रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती कळताच कळमना परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. शहरातील तृतीयपंथीयांनी मोठ्या संख्येत रुग्णालय आणि कळमना ठाण्यात धाव घेतली. ठाण्यासमोर त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. 

 

पोलिसांनी धावपळ करून उत्तमबाबाला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTransgenderट्रान्सजेंडर