शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

रेल्वेगाड्यांना आता उष्णतारोधक पेंटचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 3:06 PM

आग लागू नये यासाठी रेल्वेगाड्यांना उष्णतारोधक पेंट लावला जाणार आहे. हा पेंट लावल्यानंतर रेल्वेगाडीतील तापमान बाहेरच्या तापमानाच्या तुलनेत ६ ते ८ डिग्रीने कमी राहील. नागपूर-दादर सेवाग्राम एक्स्प्रेसपासून या प्रयोगाची सुरुवात केली जाणार आहे.

ठळक मुद्देआगीपासून वाचविणार : सेवाग्राम एक्स्प्रेसपासून सुरुवात, तापमान ६ ते ८ डिग्री कमी होईल

आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आग लागू नये यासाठी रेल्वेगाड्यांना उष्णतारोधक पेंट लावला जाणार आहे. हा पेंट लावल्यानंतर रेल्वेगाडीतील तापमान बाहेरच्या तापमानाच्या तुलनेत ६ ते ८ डिग्रीने कमी राहील. नागपूर-दादर सेवाग्राम एक्स्प्रेसपासून या प्रयोगाची सुरुवात केली जाणार आहे.वाढलेल्या तापमानामुळे रेल्वेगाड्यांना आग लागण्याच्या तीन घटना नुकत्याच घडल्या. पहिल्या वेळी बडनेराजवळ हावडा-मुंबई एक्स्प्रेसच्या इंजिनला आग लागली. दुसऱ्या वेळी मिलिटरी स्पेशल रेल्वेगाडीतील सैन्याचे ट्रक जळाले तर, दोन दिवसांपूर्वी ग्वाल्हेर येथे आंध्र प्रदेश एक्स्प्रेसचा एसी डबा जळाला.त्यामुळे रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आगीच्या घटना घडू नये यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेगाड्यांना उष्णतारोधक पेंट लावण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला प्रयोग सेवाग्राम एक्स्प्रेसवर केला जाणार आहे. या गाडीच्या छताला पेंट लावला जाईल. त्यामुळे प्रामुख्याने एसी डब्यांतील एअर कंडिशनिंग मोटरवरील दबाव कमी होईल. एसी बंद पडणार नाही. परिणामी, तापमान नियंत्रणात राहून आग लागणार नाही.तापमान कमी ठेवण्यासाठी रेल्वेगाड्यांच्या छताला उष्णतारोधक लावलेले असते तसेच फायबर ग्लासचा जाडा थर चढवलेला असतो. आता त्यावर उष्णतारोधक पेंटही लावला जाणार आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, सेवाग्राम एक्स्प्रेसच्या सर्व डब्यांना पेंट लावण्याचे काम जून संपण्यापूर्वी पूर्ण केले जाणार आहे. सर्व ऋतुंमध्ये तापमान संतुलित ठेवणे हे या पेंटचे वैशिष्ट्य आहे.आरआरआय कॅबिनमध्येही पेंटकाही वर्षांपूर्वी इटारसीतील रुट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय) कॅबिनला आग लागल्यामुळे रेल्वेसेवा दोन महिन्यांसाठी प्रभावित झाली होती. अशीच आग आठ वर्षांपूर्वी नागपूरमध्ये लागली होती. आरआरआय कॅबिनमधून सिग्नलिंग सिस्टिम कार्य करते व रेल्वेगाड्यांना फलाटावर घेतले जाते. त्यामुळे आरआरआय कॅबिनमध्येही तापमान संतुलित ठेवण्यासाठी उष्णतारोधक पेंट लावला जाणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर