नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ होताहेत ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:13 AM2019-08-07T00:13:18+5:302019-08-07T00:14:55+5:30

मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन दिवसापासून मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती. मंगळवारपासून मुंबईकडे सेवाग्राम, दुरांतो, नंदीग्राम आदी ट्रेन नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून नागपूरहून मुंबईकडे कुठलीही रेल्वे सोडण्यात आली नाही. आता परिस्थिती सामान्य झाली आहे. प्रवाशांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.

Trains are on the way from Nagpur to Mumbai | नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ होताहेत ट्रेन

नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ होताहेत ट्रेन

Next
ठळक मुद्देकाही मार्गावर अजूनही ट्रेन रद्द : प्रवाशांकडून होताहेत विचारणा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन दिवसापासून मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती. मंगळवारपासून मुंबईकडे सेवाग्राम, दुरांतो, नंदीग्राम आदी ट्रेन नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून नागपूरहून मुंबईकडे कुठलीही रेल्वे सोडण्यात आली नाही. आता परिस्थिती सामान्य झाली आहे. प्रवाशांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.
पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक बिघडले होते. रॅक उपलब्ध होत नसल्याने ट्रेनवर अजूनही प्रभाव आहे. पुणे-मुंबई व भुसावळ-इटारसी मार्ग अजूनही प्रभावित आहे. त्यामुळे काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी ११०४६ धनबाद-कोल्हापूर दीक्षाभूमी एक्स्प्रेस, ११२०१ एलटीटी-अजनी, १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, १२२६२ हावडा-मुंबई दुरांतो, १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो, १२८८० भुवनेश्वर-एलटीटी, १७६०९ पटना-पूर्णा एक्स्प्रेस, २२८४८ एलटीटी-विशाखापट्टणम, २२८६६ पुरी-एलटीटी एक्सप्रेस, १२१४६ पुरी-एलटीटी एक्स्प्रेस, १२१०१ एलटीटी-हावडा एक्सप्रेस, १९३१७ इंदूर-पुरी हमसफर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. तर १९३१८ पुरी-इंदूर हमसफर एक्स्प्रेस (०७.०८.१९ ला), १२८७९ एलटीटी-भुवनेश्वर एक्स्प्रेस (०७.०८.१९ ला) व २२८६५ एलटीटी-पुरी एक्स्प्रेस ८ आॅगस्टला रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना होत असलेल्या असुविधेबाबत रेल्वे प्रशासनाने खेद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर नागपूर व वर्धा स्टेशनवर रिफंडसाठी विशेष बूथ व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांना माहिती देण्यासाठी विशेष सहायता बूथ स्थापित करण्यात आले आहे. पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प पडल्याने प्रवाशांकडून रेल्वे स्टेशनवर विचारपूस सुरू आहे.

Web Title: Trains are on the way from Nagpur to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.