अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण
By Admin | Updated: June 12, 2017 02:32 IST2017-06-12T02:32:57+5:302017-06-12T02:32:57+5:30
श्रम व रोजगार मंत्रालयातर्फे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना नि:शुल्क प्रशिक्षण

अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रम व रोजगार मंत्रालयातर्फे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना नि:शुल्क प्रशिक्षण तसेच दरमहा ५०० रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी ११ महिन्यांचा असून उमेदवारांना इंग्रजी टायपिंग, इंग्रजी स्टेनोग्राफी, जनरल नॉलेज, जनरल इंग्लिश व बेसिक कॉम्पुटरचे नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण १ जुलै पासून सुरू होणार असून यावेळी त्याचे वय १८ ते २७ दरम्यान असावे. या प्रशिक्षणामध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअर एक वर्ष कालावधीच्या प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे व कॉम्प्युटर हार्डवेअर प्रशिक्षणासाठी १ आॅगस्ट रोजी १८ ते ३० वर्षे वयोमर्यादा व दोन्ही प्रशिक्षणासाठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कॉम्पुटर सॉफ्टवेअर १ जुलैपासून व कॉम्प्युुटर हार्डवेअर प्रशिक्षण १ आॅगस्टपासून राबविण्यात येणार आहे. प्रवेशाकरिता राष्ट्रीय आजीविका सेवा केंद्र, अध्यापन सहमार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत क्रमांक १ मधील ५ वा माळा, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे पी. एस. पाचपोर यांनी कळविले आहे.