रेल्वे प्रवाशांना मिळणार शुद्ध पाणी  : रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 09:39 PM2020-02-28T21:39:57+5:302020-02-28T21:42:26+5:30

रेल्वेगाड्यात सीलबंद पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढल्यामुळे किमतीपेक्षा अधिक दराने पाण्याच्या बॉटलची विक्री होत होती. परंतु आता प्रवाशांची गैरसोय दूर झाली असून त्यांना अधिक पैसे मोजण्याची गरज भासणार नाही. बुटीबोरीत आयआरसीटीसीचा रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू झाला आहे.

Train passengers get pure water: Rail Neer Bottling Plant started | रेल्वे प्रवाशांना मिळणार शुद्ध पाणी  : रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू

रेल्वे प्रवाशांना मिळणार शुद्ध पाणी  : रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय झाली दूर

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : रेल्वेगाड्यात सीलबंद पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढल्यामुळे किमतीपेक्षा अधिक दराने पाण्याच्या बॉटलची विक्री होत होती. परंतु आता प्रवाशांची गैरसोय दूर झाली असून त्यांना अधिक पैसे मोजण्याची गरज भासणार नाही. बुटीबोरीत आयआरसीटीसीचा रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू झाला आहे. या प्लान्टमधून दिवसाकाठी १४ हजारांपेक्षा अधिक बॉटल्स उपलब्ध होऊन त्यांचा पुरवठा करण्यात येत आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी बाटलीबंद पाण्याला प्राधान्य देतात. रेल्वे प्रशासनाने मोजक्या कंपन्यांनाच पाणी विक्रीची परवानगी दिलेली आहे. परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत नसल्याने प्रवाशांना पाण्याच्या बाटलीसाठी अधिक पैसे मोजावे लागत होते. प्रवाशांना मुबलक प्रमाणात आणि योग्य किमतीत पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच बाटलीबंद पाण्याच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी २०१३-१४ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री पवन बंसल यांनी नागपूर विभागाअंतर्गत रेल नीर प्लान्टची घोषणा केली होती. ८ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या प्लान्टमधून दररोज ७२ हजार लिटर पाणी तयार करण्याची क्षमता आहे. आॅक्टोबर २०१७ या वर्षातच हा प्रकल्प तयार होणार होता. मात्र, तांत्रिक कारणामुळे ते शक्य होऊ शकले नाही. नंतर आॅक्टोबर २०१८ मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय होते. त्यातही उशीर झाला. अखेर २०१९ च्या शेवटी हा प्रकल्प पूर्ण करण्यात विभागाला यश मिळाले. सद्य:स्थितीत याच प्लान्टमधून नागपूर रेल्वेस्थानकावर बाटलीबंद पाणीपुरवठा केला जात आहे.

नागपूरसाठी ७०० पेट्या
नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ३५ ते ४० हजार प्रवाशांची वर्दळ असते. दररोज ७०० पेटी पाण्याची गरज भासते. एका पेटीत एक लिटरच्या २४ बाटल्या असतात. उन्हाळ्यात पाण्याची मागणी दुपटीने वाढल्यास पाण्याचा काळाबाजार व्हायचा. आता रेल नीर प्लाँट सुरू झाल्याने यावर आळा बसणार आहे. भारतीय रेल्वेत रेल नीरचेच पाणी वापरावे, असे निर्देश आहेत. विशेष म्हणजे रेल नीरचा प्रकल्प बिलासपूरला आहे. तेथूनच नागपूरसाठी पाणी मागविल्या जायचे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यास मागणीच्या तुलनेत पाहिजे तसा पुरवठा होत नव्हता. आता नागपुरातच प्लान्ट सुरू झाल्याने बिलासपूरहून पाणी मागविण्याची गरज नाही.

Web Title: Train passengers get pure water: Rail Neer Bottling Plant started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.