रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल, हाती ‘वेटिंग’चे तिकीट

By Admin | Updated: May 12, 2014 00:28 IST2014-05-12T00:28:33+5:302014-05-12T00:28:33+5:30

उन्हाळ्याच्या सुट्यात बाहेरगावी फिरायला जाणार्‍या नागरिकांच्या पदरी निराशा पडत आहे. ऐनवेळी प्रवासी प्लॅनिंग केल्यामुळे त्यांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत ...

Train, HouseFull, 'Waiting' ticket | रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल, हाती ‘वेटिंग’चे तिकीट

रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल, हाती ‘वेटिंग’चे तिकीट

नागपूर : उन्हाळ्याच्या सुट्यात बाहेरगावी फिरायला जाणार्‍या नागरिकांच्या पदरी निराशा पडत आहे. ऐनवेळी प्रवासी प्लॅनिंग केल्यामुळे त्यांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत असून नाईलाजास्तव त्यांना आपला प्रवासाचा बेत रद्द करण्याची पाळी येत आहे. नागपुरातून चारही दिशांना जाणार्‍या रेल्वेगाड्यांमधील बर्थचा आढावा घेतला असता सर्वच गाड्यात वेटिंगची स्थिती आहे. उन्हाळ्याच्या सुट्यात नागपूरमार्गे चारही दिशांना जाणार्‍या रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे. मुंबईकडील गाड्यात विदर्भ एक्स्प्रेसचा एसी फर्स्ट क्लास ३ जूनपर्यंत, एसी सेकंड १७ जूनपर्यंत, एसी थर्ड २३ जूनपर्यंत आणि स्लिपरक्लास १६ जूनपर्यंत फुल्ल आहे. दुरांतोत एसी फर्स्ट १९ मेपर्यंत, एसी सेकंड २७ मेपर्यंत, एसी थर्ड २८ मेपर्यंत आणि स्लिपरक्लास २९ मेपर्यंत फुल्ल आहे. सेवाग्राम एक्स्प्रेसचा एसी फर्स्ट ३ जूनपर्यंत, एसी सेकंड ४ जूनपर्यंत आणि स्लिपरक्लास २९ मेपर्यंत वेटिंग आहे. पुण्याकडील गाड्यात नागपूर-पुणे एक्स्प्रेस एसी फर्स्ट, सेकंड आणि स्लिपरक्लास १६ जूनपर्यंत फुल्ल आहे. नागपूर-पुणे गरीबरथही १६ जूनपर्यंत फुल्ल आहे. अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसमध्येही १६ मेपर्यंत वेटिंग आहे. नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसचे सर्व कोच १० जूनपर्यंत फुल्ल आहेत. नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेसही जून महिन्यापर्यंत हाऊसफुल्ल आहे. नागपूर-इंदूर एक्स्प्रेसमध्येही तीच स्थिती आहे. दिल्लीकडील गाड्यात जीटी एक्स्प्रेसमध्ये जुलैपर्यंत ‘नो रूम’ आहे. तामिळनाडूतही ‘नॉट अ‍ॅव्हेलेबल’ आहे. दक्षिण एक्स्प्रेसही २७ जूनपर्यंत फुल्ल असून, चेन्नईकडील तामिळनाडू एक्स्प्रेस १७ जूनपर्यंत वेटिंगवर आहे. ग्रॅण्ड ट्रंक एक्स्प्रेस २४ जूनपर्यंत हाऊसफुल्ल असून, जयपूर-मद्रास एक्स्प्रेस २६ मेपर्यंत वेटिंग आहे. बंगळुरूकडील गाड्यात निजामुद्दीन-बंगळुरू राजधानी एक्स्प्रेस ३० जूनपर्यंत, जयपूर-म्हैसूर एक्स्प्रेसही २६ जूनपर्यंत फुल्ल आहे. संघमित्रा एक्स्प्रेसमध्येही २३ जूनपर्यंत वेटिंग आहे. हैदराबादकडे जाणार्‍या गाड्यात एपी एक्स्प्रेस २७ मेपर्यंत वेटिंग आहे. दक्षिण एक्स्प्रेसमध्येही २६ जूनपर्यंत वेटिंग आहे. पटना-सिकंदराबाद एक्स्प्रेसही १३ जूनपर्यंत फुल्ल आहे. हावडाकडे जाणार्‍या गाड्यात गीतांजली एक्स्प्रेसमध्ये नॉट अ‍ॅव्हेलेबलची स्थिती आहे. आझादहिंद एक्स्प्रेस २९ जूनपर्यंत फुल्ल आहे. एलटीटी-हावडा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसही २४ जूनपर्यंत वेटिंगवर आहे. जयपूरकडे जाणार्‍या गाड्यात जयपूर एक्स्प्रेस जुलै महिन्यापर्यंत, नागपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस १७ जूनपर्यंत वेटिंगवर आहे. सर्वच रेल्वेगाड्यांची स्थिती बघितली असता, मे महिनाभर वेटिंगची स्थिती आहे. (प्रतिनिधी) तात्काळमध्ये आहेत बर्थ उपलब्ध रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती असली तरी अनेक गाड्यात तात्काळचे बर्थ उपलब्ध आहेत. त्यामुळे दलालांकडे जाऊन तिकीट खरेदी करण्याऐवजी एक दिवस आधी प्रवाशांनी तात्काळच्या रांगेत उभे राहून तिकीट खरेदी केल्यास त्यांना कन्फर्म बर्थ मिळू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी तात्काळच्या रांगेत उभे राहून आपल्या तिकिटाचे आरक्षण करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Train, HouseFull, 'Waiting' ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.