शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

नागपुरात बारा वर्षीय शाळकरी मुलाचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 8:20 PM

वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. पीयूष श्रीकांत घोडे (वय १२) असे या मुलाचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजापेठ भागात राहत होता.

ठळक मुद्देवाहनचालकाचा निष्काळजीपणा : वाहनातील टिनाने कापला गळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. पीयूष श्रीकांत घोडे (वय १२) असे या मुलाचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजापेठ भागात राहत होता.सोमवारी रात्री ७ च्या सुमारास पीयूष त्याच्या वस्तीत सायकल चालवित होता. त्याच्या घराजवळ टी पॉर्इंट आहे. तेथे एमएच ३१/ सीबी ६७९४ च्या चालकाने टाटा एस वाहन उभे केले. वाहनात मागेपर्यंत आलेले लोखंडी पत्रे (टिना) लादले होते. कोणतीही धोक्याची सूचना किंवा संकेत नव्हते किंवा वाहनचालकाने तेथे मागे उभे राहण्याचीही काळजी घेतली नाही. त्यामुळे काहीसा वेगात सायकलने आलेला पीयूष सायकलसह टिनावर आदळला. त्याचा गळा कापला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. तशाही अवस्थेत तो उठून उभा झाला आणि बाजूला असलेल्या घराच्या दिशेने पळत सुटला. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी आरडाओरड केली. बाजुलाच पीयूषचे वडील उभे होते. त्यांनी लगेच पीयूषला जवळ घेतले. त्याला गंभीर अवस्थेत डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातामुळे परिसरात शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच हुडकेश्वरचे सहायक निरीक्षक सावंत आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी पीयूषच्या मृत्यूला कारणीभूत असलेले वाहन ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी वाहनचालकाविरुद्ध कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक झालेली नव्हती.

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थी