रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:07 IST2021-01-15T04:07:54+5:302021-01-15T04:07:54+5:30

नागपूर : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहाथ अटक करून ९ हजार रुपये किमतीची ...

Traffickers arrested for blackmailing train tickets | रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक

नागपूर : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहाथ अटक करून ९ हजार रुपये किमतीची ई तिकिटे जप्त केली आहेत.

रेल्वे सुरक्षा दलाला मौदा येथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाचे इतवारी येथील निरीक्षक आर. के. सिंग, उपनिरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन, इशान दिक्षित, ओमेश्वर सिंग, विनोद कुमार यांच्या पथकाने मौदा येथे धाड टाकली. दरम्यान, रामनगर मौदा येथे रोशन हटवार (३४) हा ई तिकिटांचा काळाबाजार करताना आढळला. तो आपल्या तीन पर्सनल आयडीच्या माध्यमातून प्रवाशांकडून १०० ते २०० रुपये अधिक घेऊन तिकीट पुरवित होता. त्याच्याकडून ९ हजार रुपये किमतीचे ७ तिकिटे जप्त करण्यात आली. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींविरुद्ध यापुढेही अभियान राबविण्यात येणार असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाने सांगितले.

............

Web Title: Traffickers arrested for blackmailing train tickets