चिंचभवनच्या आरओबीवरून १ फेब्रुवारीपासून वाहतूक सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST2021-01-13T04:17:12+5:302021-01-13T04:17:12+5:30

नागपूर : वर्धा रोडवरील चिंचभवन आरओबीचा रेल्वे ट्रॅकच्या वरील भाग आता तयार झाला आहे. काँक्रिटीकरणानंतर आता यावर मास्टिकचा ...

Traffic will start from February 1 from ROB of Chinch Bhavan | चिंचभवनच्या आरओबीवरून १ फेब्रुवारीपासून वाहतूक सुरू होणार

चिंचभवनच्या आरओबीवरून १ फेब्रुवारीपासून वाहतूक सुरू होणार

नागपूर : वर्धा रोडवरील चिंचभवन आरओबीचा रेल्वे ट्रॅकच्या वरील भाग आता तयार झाला आहे. काँक्रिटीकरणानंतर आता यावर मास्टिकचा थर चढविला जाईल, त्यानंतर १ फेब्रुवारीपासून या पुलावरून वाहतूक सुरू होणार आहे.

२०१९ पासून या पुलाचे काम सुरू असून या कामात वारंवार अडचणी आल्या होत्या. मात्र त्यावर मात करून पुलाचे काम पूर्णत्वाला गेले आहे. सुरुवातीला पुलाच्या डिझाईनवरून मुद्दा गाजला. त्यानंतर एकदाची डिझाईन तयार झाली, मात्र, त्यानंतर गर्डर वेळेवर आले नाही. ते पोहोचल्यावर लावण्यासाठी तेवढ्या उंचीच्या क्रेनची समस्या आली. यामुळे ५५ मीटरचा गर्डर दोन भागांत तयार करून जोडण्यात आला. यावरून गर्डरच्या मजबुतीबद्दल प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर थर्ड पार्टी या नात्याने व्हीएनआईटीकडून दोन वेळा गर्डरच्या मजबुतीबद्दल पाहणी आणि खातरजमा करण्यात आली. हे काम वेगाने पूर्ण होता रखडले. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कामात खंड पडला. या अडचणी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. रेल्वेकडून ब्लॉक मिळवितानाही बऱ्याच अडचणी आल्या. सर्व्हिस रोड, नाली, एप्रॉन आदी कामे काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाली होती. येथे फक्त गर्डरवर काँक्रिटीकरणाचे काम बाकी राहिले होते.

...

वाहतुकीच्या कोंडीपासून सुटका होणार

नागपूर-वर्धा हायवेवर शहरातील चिंचभवन येथे असलेला आरओबी ‘बॉटल नेक’ म्हणून परिचित आहे. या मार्गाच्या अरुदपणामुळे हा ब्लॅक स्पॉट ठरला होता. यासोबतच जुन्या निमुळत्या होत गेलेल्या आरओबीवरूनच वाहतूक होत असल्याने या ठिकाणी नेहमीच जाम लागतो. मात्र, दीर्घ प्रतीक्षेनंतर आला लवकरच या मार्गावरून वाहतूक करणाऱ्यांना दिलासा जाणवणार आहे. वाहनाचा वेग कायम ठेवून येथून पुढे निघणे आता सुलभ होणार आहे.

...

काय आहे मास्टिक?

मास्टिकचा थर म्हणजे, प्लास्टिक, रबर आणि गिट्टीच्या मिश्रणाचा थर आहे. गर्डर असलेल्या काँक्रीट रोडवर सुमारे ४० मिमीचा थर पसरविला जाईल. यामुळे अवजड वाहनांचा भार थेट गर्डरवर न पडता मास्टिकवर पडेल. त्यात वापरलेल्या प्लास्टिक आणि रबरामुळे वाहनाच्या वजनाचे संतुलन योग्य राखले जाईल.

...

कोट

चिंचभवन आरओबीचे (दुसरा टू-लेन) काम आता पूर्ण झाले आहे. कोणतेही वाहन घसरू नये, यासाठी आता फक्त वर थर टाकला जाईल. यानंतर साधारणत: १ फेब्रुवारीला याचे उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल.

- अभिजीत जिचकार, प्रोजेक्ट डायरेक्टर, एनएचएआय

Web Title: Traffic will start from February 1 from ROB of Chinch Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.