पारंपरिक पद्धतीने रंगला संक्रांत मेळावा
By Admin | Updated: January 19, 2015 00:53 IST2015-01-19T00:53:58+5:302015-01-19T00:53:58+5:30
नखशिखांत दागिन्यांनी मढलेल्या आणि नऊवारी घातलेल्या सखी... गीता मंदिर येथील सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह... कुणी उखाणे घेण्यात कुणी तीळ व्यंजनाच्या गोडीत...

पारंपरिक पद्धतीने रंगला संक्रांत मेळावा
स्पर्धा, मनोरंजनाची धमाल : सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : नखशिखांत दागिन्यांनी मढलेल्या आणि नऊवारी घातलेल्या सखी... गीता मंदिर येथील सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह... कुणी उखाणे घेण्यात कुणी तीळ व्यंजनाच्या गोडीत... ‘संक्रांत सखी’चा धमाका आणि ‘फॅशन शो’ ची धम्माल...अविस्मरणीय दिवस आणि पारंपरिक पद्धतीने रंगलेला संक्रांत मेळावा.
निमित्त होते लोकमत सखी मंचच्या संक्रांत मेळाव्याचे. उद्घाटन डुंभरे ज्वेलर्सचे शशांक डुंभरे व रेणु डुंभरे, सार्इंताज बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे मुकुंद श्रावणकर व रंजना श्रावणकर, कलाकृती साडीज्चे महेश कुमार, मधु ब्युटी पार्लरच्या माधुरी चौरसिया, वाघ्रळकर आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या स्वाती यांच्या उपस्थितीत झाले. या सोहळ्यात सखी आपल्या कुटुंबांसह उपस्थित होत्या. मेळाव्याची सुरुवात हळद कुंकू आणि तिळगुळ देऊन झाली. प्रत्येक सखीला मधु ब्युटी पार्लरच्यावतीने २५० रुपये किमतीचे फ्रूट फेशियलचे कूपन व वाघ्रळकर आयुर्वेदिक हॉस्पिटलच्यावतीने फेसपॅक संक्रांतीच्या वाणाच्या स्वरूपात देण्यात आले.
संक्रांत सखी स्पर्धा, उखाणे स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा व व्हेजिटेबल क्वीन या विशेष शोने सोहळ्यात रंगत आणली. यावेळी डुंबरे ज्वेलर्सच्या प्रतिनिधीने सखींना ज्वेलरी बचत योजनांची माहिती दिली. या मेळाव्याला डुंबरे ज्वेलर्स, सार्इं ताज बिल्डर अॅण्ड डेव्हलपर्स, कलाकृती साडीज्, वाघ्रळकर आयुर्वेदिक हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर आणि मधु ब्युटी पार्लर आदींचे सहकार्य मिळाले. संचालन सखी मंच संयोजिका नेहा जोशी यांनी केले.
विविध स्टॉल्सवर उसळली गर्दी
या मेळाव्यात सखींसाठी विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. यात पाणीपुरीपासून ते सौंदर्य साहित्य आणि साड्यांचे स्टॉल्सला सखींनी भरभरुन प्रतिसाद दिला. उत्कृष्ट स्टॉल्सला पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार सुचिता नारळे यांच्या एक्सक्ल्युसिव्ह ज्वेलरीच्या स्टॉलला प्रदान करण्यात आला.
सखींच्या प्रतिभेची परीक्षा
या मेळाव्यात संक्रांतीच्या विशेष व्यंजनाची स्पर्धा घेण्यात आली. यात सहभागी सखींनी तिखट तर कोणी गोड पदार्थ घरून तयार करून आणले होते. मेळाव्याच्या मुख्य आकर्षणापैकी एक पारंपरिक उखाणा स्पर्धेने रंगत आणली. व्हेजिटेबल क्वीन स्पर्धेत स्पर्धकांच्या कल्पनेला भरारी मिळाली.
यात सहभागी सखी भाजी आणि फळांचा वापर करून रँपवर चालल्या. ‘संक्रांती फॅशन शो’मध्ये सखी हलव्यांचे दागिने आणि साडी घालून रँपवर चालल्या. लहान मुलांसाठी घेण्यात आलेल्या ‘फॅशन शो’ ने मेळाव्याला वेगळी रंगत आणली. या विविध स्पर्धेचे परीक्षण श्वेता नानोटी, नीलिमा हारोडे, राजश्री गाणार, कल्याणी लामधरे, नीतू कुमार, मंजूषा बिवाटे, शालिनी मानापुरे, कल्पना गुलालकरी यांनी केले.(प्रतिनिधी)
विजेत्यांची नावे
तीळ व्यंजन : प्रथम माधुरी राऊत, द्वितीय- ललिता निकम, तृतीय श्रद्धा चव्हाण.
व्हेजिटेबल क्वीन- प्रथम कल्पना जांभुळकर, द्वितीय स्रेहा सालगुंजेवार, तृतीय विभा भुसारी, प्रोत्साहन पुरस्कार लीना पाटील व भावना चापके.
उखाणे स्पर्धा- प्रथम वनिता भाईक, द्वितीय प्रतिभा मदनकर आणि तृतीय संगीता पिसाळ.
संक्रांती फॅशन शो- प्रथम संध्या वरघडे, द्वितीय अर्चना पगाडे, तृतीय शोभा वासनिक, प्रोत्साहन पुरस्कार- विनया एकनाथे व ज्योति शेंडे
किड्स फॅशन शो- प्रथम मृदुल पौनीकर, द्वितीय स्पर्श वेरुळकर आणि तृतीय परिंद सावदेकर, प्रोत्साहन पुरस्कार- लोकेश शेळके व नियती उज्जैनकर.
प्रत्युषाने घेतला उखाणा
संक्रांती मेळाव्याचे मुख्य आकर्षण सोनी टीव्हीवरील ‘हम है ना’ या मालिकेचे कलावंत कंवर ढिल्लन आणि प्रत्युषा बॅनर्जी होते. या दोघांचे मेळाव्यात आगमन होताच एकच जल्लोष झाला. दोन्ही कलावंतांनी सखींशी संवाद साधत सखींच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.