नागपुरात पारंपरिक आणि ग्रीन फटाक्यांची आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 11:15 PM2019-10-25T23:15:53+5:302019-10-25T23:18:13+5:30

दिवाळी दोन दिवसांवर असून फटाक्यांच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.यंदा कमी आवाज, आकाशात रंगाची उधळण करणारे आणि ग्रीन फटाक्यांची धूम आहे.

Traditional and green fireworks in Nagpur | नागपुरात पारंपरिक आणि ग्रीन फटाक्यांची आतषबाजी

नागपुरात पारंपरिक आणि ग्रीन फटाक्यांची आतषबाजी

Next
ठळक मुद्देफॅन्सी आणि अनाराचे विविध प्रकार : आकाशात रंगाची उधळण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी दोन दिवसांवर असून फटाक्यांच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. गांधीबाग मुख्य बाजारासह स्थानिक बाजारात पारंपरिक आणि फॅन्सी फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यंदा कमी आवाज, आकाशात रंगाची उधळण करणारे आणि ग्रीन फटाक्यांची धूम आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची कमी आवाजाच्या फॅन्सी फटाक्यांना पसंती मिळत आहे.


यावर्षी फटाके १० ते १५ टक्क्यांनी महाग आहेत. फॅन्सी आणि ग्रीन फटाक्यांची रेंज २५० ते ३०० रुपयांपासून आहे. या बाजारपेठांमध्ये कोट्यवधींची उलाढात होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. देशात ९९ टक्के फटाक्यांची निर्मिती तामिळनाडू राज्यातील शिवाकाशी येथे होते. बदलत्या काळानुसार लोकांची फटाक्यांच्या बाबतीत पसंती बदलत आहे. पूर्वी कागदी लक्ष्मी बॉम्ब, रस्सी बॉम्ब, अ‍ॅटम बॉम्ब या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना जास्त मागणी होती. आता कमी आवाजाच्या फटाक्यांना जास्त पसंती आहे. यामध्ये फॅन्सी मॅजिक पॉप, ड्रॅगन फाईट, मायाजाल, जम्पर, बटरफ्लाय, पॉपकॉर्न, पोगो, एअर ट्रॉफिक, पिंक रोज या फटाक्यांची धूम आहे.
ठोक व्यापारी ललित कारवटकर यांनी सांगितले की, यंदा बाजारात फॅन्सी फटाक्यांना जास्त मागणी आहे. या फटाक्यांमुळे लखलखाट होतो, पण धूर निघत नाही. रंगोली फटाका, कलर स्मोक, कलर मॅजिक, १६ म्युझिकल आयटम, रॉकेटमध्ये गोल्ड स्टार, गोल्डा बिलो, जस्मीन कॉर, रेड कॉर, पॅराशूट मिसाईल, जम्बो रॉकेट असून यातून आकाशात एकाचवेळी १०० फटाके उडतात. त्याशिवाय ५कलर फुलझडी, सिटी पार्क अ‍ॅण्ड पॅराडाईज २५० शॉर्ट शॉवर, ट्राय कलर मिलेनियम, मनी स्पीनर आणि म्युझिक रोल आहे. तसेच ग्राऊंड फॅक्टर, जेट फाऊंटेन रेम्बो कलर, अनार यामध्ये सात रंग निघतात. चक्री, स्काय शॉर्ट आणि अनारमध्ये अनेक प्रकार आहेत.
 

ग्रीन फटाक्यांमुळे प्रदूषणाचा स्तर कमी होणार
प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी बाजारात ग्रीन फटाके उपलब्ध आहेत. यात अनार, पेन्सिल, चकरी, फुलझडी आणि सुतळी बॉम्बचा समावेश आहे. पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत ग्रीन फटाक्यांमुळे ३० ते ४० टक्के प्रदूषण कमी होते. ग्रीन फटाक्यांचा शोध राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेने (नीरी) केला आहे. हे फटाके पारंपरिक फटक्यांसारखेच असतात, पण जाळल्याने प्रदूषण कमी होते.

आकाशात रंगाची उधळण करणाऱ्या  फटाक्यांना मागणी
काही वर्षांपासून आकाशात रंगाची उधळण करणाऱ्या  फटाक्यांची मागणी वाढली आहे. यामध्ये अनेक प्रकार आहे. त्यानुसार त्याचे भाव आहेत. रेंज १०० पासून ७ हजार रुपयांपर्यंत आहे. एका मोठ्या डब्यातील फटाके १००, २०० आणि ५०० वेळा आकाशात जाऊन फुटतात. त्यातून रंगाची उधळण होते. हे फटाके सर्वांच्या आवडीचे आहेत.

लहानांसाठी विशेष गन्स
खास लहानांसाठी कमी धूर आणि आवाज असणाऱ्या  फटाक्यांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. गोल्ड क्वाईन आणि अशरफी पॉटसारख्या जवळपास अधिक प्रकाश देणाऱ्या  अनारची चांगली मागणी आहे. ही गन आता हायटेक झाली आहे. स्प्रिंग गनमध्ये टिकली ठेवून फोडल्याने डबल आवाज येतो. सिक्स राऊंड गन जी मॅग्जीनसह आली आहे. किंमत ५० पासून ५०० रुपयांपर्यंत आहे.

Web Title: Traditional and green fireworks in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.