शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

सीसीआयच्या जाचक अटींनी व्यापाऱ्यांचे भले, प्रतिक्विंटल हजार रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 13:22 IST

Nagpur : जिल्हानिहाय एकरी ३ ते ५.६० क्विंटल करणार खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीसीआय कापूस खरेदी करण्यास दिरंगाई करत तर, दुसरीकडे त्यांनी एकरी ३ ते ५.६० क्विंटल कापूस खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाला पाठविला व त्याला मंजुरीदेखील मिळाली आहे. कापूस खरेदीची ही अट देशभर जिल्हानिहाय वेगवेगळी आहे. त्यामुळे उरलेला कापूस एमएसपीपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना विकावा लागणार असल्याने देशातील कापूस उत्पादकांना प्रतिक्विंटल किमान एक हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

कापसाची केंद्र सरकारने एमएसपी प्रतिक्विंटल ८,११० रुपये जाहीर केली असून, सध्या देशांतर्गत बाजारात कापसाला प्रतिक्विंटल ६,५०० ते ७,८०० रुपये दर मिळत आहे. देशभरातील कापूस उत्पादकता किमान ८ ते १२ क्विंटल प्रतिएकर आहे. 

सीसीआयची कापूस खरेदी अट विचारात घेता शेतकऱ्यांना त्यांच्याकडील एकरी ५ ते ९ क्विंटल कापूस व्यापाऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने विकावा लागणार असल्याने त्यांना प्रतिक्विंटल ४०० ते १,६०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. या निर्णयाबाबत देशातील सीसीआयचा एकही अधिकारी बोलायला तयार नसला तरी मध्यप्रदेश व तेलंगणातील दोन अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.

४०० कोटी रुपयांचे नुकसान

देशभरात २०२५-२६ च्या खरीप हंगामात ३२५ ते ३४० लाख गाठी म्हणजेच ५५२.५ ते ५७८ कोटी क्विंटल कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. प्रतिकूल हवामान व पावसामुळे त्यात किमान २० टक्क्यांची घट होऊ शकते. सीसीआयच्या अटींमुळे शेतकऱ्यांचे किमान ४०० कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

कापूस खरेदी केंद्र

सीसीआयने २०२५-२६ च्या हंगामासाठी देशात एकूण ५५० तर महाराष्ट्रात १५९ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.महाराष्ट्रातील खरेदी केंद्रांमध्ये नाशिक, लातूर व गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी एक, धुळे, नंदूरबार व हिंगोली प्रत्येकी चार, वाशिम ५, जळगाव १५, अहिल्यानगर व अकोला प्रत्येकी ६, नांदेड ७, परभणी व चंद्रपूर प्रत्येकी १०, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड प्रत्येकी ९, नागपूर ११, वर्धा ५, यवतमाळ १८ आणि अमरावती जिल्ह्यातील ८ केंद्रांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : CCI's strict rules hurt farmers; ₹1000/quintal loss expected.

Web Summary : CCI's cotton procurement limits, varying by district, force farmers to sell surplus cotton below MSP. This could lead to losses of ₹1000 per quintal, potentially costing farmers ₹400 crore nationwide.
टॅग्स :cottonकापूसfarmingशेतीFarmerशेतकरीnagpurनागपूर