'टूर चले हम'मध्ये काश्मीर, नैनीताल, दाजिर्लिंग, गंगटोक सहली

By Admin | Updated: May 10, 2014 01:20 IST2014-05-10T01:20:32+5:302014-05-10T01:20:32+5:30

नागपूर : दरवर्षीप्रेमाणे यंदाही लोकमत सखी मंचच्यावतीने थंड हवेच्या ठिकाणी सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पर्यटकांना काश्मीर, नैनीताल, दाजिर्लिंग

Tour, in Kashmir, Nainital, Dahiril, Gangtok trips | 'टूर चले हम'मध्ये काश्मीर, नैनीताल, दाजिर्लिंग, गंगटोक सहली

'टूर चले हम'मध्ये काश्मीर, नैनीताल, दाजिर्लिंग, गंगटोक सहली

नागपूर : दरवर्षीप्रेमाणे यंदाही लोकमत सखी मंचच्यावतीने थंड हवेच्या ठिकाणी सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पर्यटकांना काश्मीर, नैनीताल, दाजिर्लिंग आणि गंगटोक येथील आनंद लुटता येणार आहे.
काश्मीरला जाणे प्रत्येकाचे स्वप्न असते. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून सखी मंचच्या माध्यमातून सामान्य माणसांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सहलींना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच खास आग्रहास्तव या सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. १0 दिवसांची काश्मीरची सहल ही दि. २८ मे रोजी जाणार आहे. भारताचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या काश्मिरातील श्रीनगर, गुलर्मग, पहलगाम, सोनर्मग इत्यादी स्थळांचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण असते. या सर्व ठिकाणांचा समावेश या सहलीमध्ये करण्यात आला आहे.
हाऊसबोटमधील मुक्काम म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद. या सहलींमध्ये हा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. श्रीनगर येथील निशांत गार्डन, शालिमार गार्डन, हजरत बल दर्गा, शंकराचार्य मंदिर इत्यादी स्थळांना भेटी आणि डल लेकमध्ये शिकारा राईड एकूणच प्रवासाचा थकवा कुठल्या कुठे निघून जाणारा आहे. अनेक चित्रपटांचे शुटिंग झालेल्या चार चीनार, नेहरू गार्डन हे सुद्धा पर्यटनाचे मुख्य आकर्षण राहणार आहे.
सहलीसाठी प्रति व्यक्ती १६,९९९ शुल्क आकारण्यात आले आहे. यातील ५0 टक्के रक्कम बुकिंग करतेवेळी भरावयाची आहे.
दुसरी सहल दाजिर्लिंग गंगटोक येथे ३0 मे रोजी जाणार आहे. ही सहल दहा दिवसांची असून त्यासाठी १३,९९९ रुपये शुल्क राहणार आहे.
चहासाठी जगप्रसिद्ध असलेले दाजिर्लिंग, सुंदर स्वच्छ नियोजनबद्ध शहर म्हणून प्रसिद्ध असलेले गंगटोक शहर. या शहरातील स्वच्छ दर्शनासोबत येथील अतिशय सुंदर बाजारपेठ बघण्यासारखी आहे. मंदाकिनी वॉटरफॉल तिबेटालॉजी मॅनिस्ट्री डिमर पार्क, हँडीक्रॉफ्ट सेंटर, गणेश टोक, हनुमान टोक, छांगु लेक बाबा हरभजन मंदिर आदी प्रेक्षणीय स्थळे बघण्यासारखी आहेत. विस्तीर्ण चहाच्या मळ्यात वसलेल्या दाजिर्लिंग शहरात टायगर हील, बतासा लूक, हिमालयीन माऊंटेनिअरिंग, हिस्ट्री म्युझियम, तेजिंग पार्क आर्ट गॅलरी, रॉक गार्डन इत्यादी प्रेक्षणीय स्थळांचा समावेश आहे.
नैनीताल या थंड हवेच्या ठिकाणी आठ दिवसांची सहल जाणार आहे. या सहलीमध्ये स्थानिक नैनीताल मधील सात्ताल, भीमताल, नौकोचीआताल हनुमान गढी इत्यादी प्रेक्षणीय स्थळे या व्यतिरिक्त कसौनी, रानीखेत या स्थळांना भेटी देण्यात येणार आहे. ५ जून रोजी नैनीताल येथील सहल जाणार आहे. त्यासाठी १४, ९९९ शुल्क आकारण्यात आले आहे. मोजक्याच जागा शिल्लक असून इच्छुक सदस्यांनी त्वरित लोकमत कार्यालयात २४२९३५५, ९४२३६२८५00, ९८५0३0४0३७ यावर संपर्क साधावा.(प्रतिनिधी)

Web Title: Tour, in Kashmir, Nainital, Dahiril, Gangtok trips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.