लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:10 IST2021-03-08T04:10:00+5:302021-03-08T04:10:00+5:30

काेराडी : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करून वारंवार अत्याचार केला, नंतर लग्न करण्यास नकार दिल्याने प्रकरण ...

Torture by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

काेराडी : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करून वारंवार अत्याचार केला, नंतर लग्न करण्यास नकार दिल्याने प्रकरण पाेलिसात पाेहाेचले. हा प्रकार काेराडी (ता. कामठी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काेराडी नाका परिसरात असलेल्या शंभूनगर, तिरंगा चाैक येथे नुकताच घडला. यातील आराेपीस अटक करण्यात आल्याचे पाेलिसांनी सांगितले.

नीलेश रामोजी भजबे (२८, रा.शंभूनगर, काेराडी नाका) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. नीलेशने त्याच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या तरुणीशी ओळख करून मैत्री केली. याच मैत्रीतून त्याने त्या तरुणीला लग्न करण्याची बतावणी करीत, तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर तिने त्याच्याकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला. मात्र, त्याने लग्न करण्यास नकार दिल्याने तिने पाेलिसात धाव घेतली. ती विवाहित असून, तिला मुलगी असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी काेराडी पाेलिसांनी भादंवि ३७६ (२), ५०६ अन्वये गुन्हा नांदवून आराेपीस अटक केली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक कल्पना चव्हाण करीत आहेत.

Web Title: Torture by showing the lure of marriage