फ्रुटी देण्याच्या बहाण्याने अत्याचार; आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 18, 2024 05:17 PM2024-03-18T17:17:20+5:302024-03-18T17:17:41+5:30

सत्र न्यायालयाचा निर्णय : एमआयडीसी क्षेत्रातील घटना

Torture on the pretext of giving fruiti; 20 years rigorous imprisonment for the accused by Court | फ्रुटी देण्याच्या बहाण्याने अत्याचार; आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

फ्रुटी देण्याच्या बहाण्याने अत्याचार; आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

नागपूर : सहा वर्षाच्या चिमुकलीला फ्रुटी देण्याच्या बहाण्याने स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला सोमवारी २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना एमआयडीसी पोलिसांच्या क्षेत्रातील आहे.

एडवीन मायकेल फ्रान्सिस (५९) असे आरोपीचे नाव असून तो सीम टाकळी येथील रहिवासी आहे. आरोपीने दंड जमा केल्यास ती रक्कम पीडित मुलीला भरपाई म्हणून अदा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पीडित मुलगी व आरोपीची ओळख होती. मुलीचे आई-वडील रोज सकाळी कामावर जात होते व सायंकाळी घरी परत येत होते. त्यामुळे दिवसभर मुलगी व तिची आजी या दोघीच घरी राहत होत्या. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२ च्या सुमारास मुलगी चॉकलेट खरेदी करण्यासाठी दुकानात जात होती. दरम्यान, आरोपी तिला फ्रुटी देण्याच्या बहाण्याने स्वत:च्या घरी घेऊन गेला व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने आई घरी आल्यानंतर तिला घडलेच्या प्रकाराची माहिती दिली. परिणामी, आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. आसावरी परसोडकर यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Torture on the pretext of giving fruiti; 20 years rigorous imprisonment for the accused by Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.