अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आराेपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:20 IST2021-01-13T04:20:46+5:302021-01-13T04:20:46+5:30
कन्हान : घराशेजारी राहणाऱ्या आराेपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीवरून आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून पाेलिसांनी त्यास अटक केली आहे. ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आराेपीस अटक
कन्हान : घराशेजारी राहणाऱ्या आराेपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीवरून आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून पाेलिसांनी त्यास अटक केली आहे.
विनाेद ऊर्फ वीरू अशाेक टेकाम (२२, रा. खदान क्र. ६ टेकाडी) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. घराशेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय पीडित मुलीसह आराेपीची गेल्या तीन वर्षांपासून मैत्री हाेती. त्यांची मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. ही बाब पीडितेच्या पालकांना कळल्याने तिने उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. पीडित मुलगी अल्पवयीन असून, त्याचा फायदा घेत आराेपीने तिच्या मर्जीने खदान क्र. ६ टेकाडी येथील रूमवर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून कन्हान पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, सहकलम ४ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीस अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत.