जादूटोण्याच्या नावाआड विवाहितेला यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:09 IST2021-07-07T04:09:14+5:302021-07-07T04:09:14+5:30

नागपूर - भूतबाधा दूर करण्याच्या नावाखाली एका कथित मांत्रिकाने नवऱ्याच्या मदतीने एका विवाहितेला यातना दिल्या. तब्बल दीड वर्षे तिचा ...

Torture of a married woman in the name of witchcraft | जादूटोण्याच्या नावाआड विवाहितेला यातना

जादूटोण्याच्या नावाआड विवाहितेला यातना

नागपूर - भूतबाधा दूर करण्याच्या नावाखाली एका कथित मांत्रिकाने नवऱ्याच्या मदतीने एका विवाहितेला यातना दिल्या. तब्बल दीड वर्षे तिचा शारीरिक आणि लैंगिक छळही केला. हा प्रकार उघड झाल्यानंतर यशोधरानगर पोलिसांनी सोमवारी कथित मांत्रिक मनीष वंजारी (वय ४५, रा. नरसाळा) आणि महिलेच्या नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नवऱ्याच्या छळामुळे दहशतीत असलेल्या महिलेची (वय ३५) वारंवार प्रकृती बिघडत होती. त्यामुळे तिचा आरोपी नवरा डिसेंबर २०१९ मध्ये तिला कथित मांत्रिक वंजारीकडे घेऊन गेला. वंजारी हा एका बँकेत सिक्युरिटी गार्ड आहे. तो आपल्या घरात दरबार भरवून तंत्रमंत्राच्या नावाखाली भोळ्याभाबड्या नागरिकांना लिंबू, रक्षा, गंडेदोरे देतो. आरोपीने पत्नीला वंजारीकडे नेताच त्याने महिलेला भूतबाधा झाल्याचे सांगून तिचा उपचाराच्या नावाखाली छळ सुरू केला. रक्षा देऊन, मंतरलेले पाणी देऊन तो महिलेचे लैंगिक शोषणही करू लागला. पीडितेचा नवरा मात्र डोळ्यांवर झापड बांधल्यासारखा मांत्रिकाने सांगितल्यानुसार करू लागला.

---

अखेर वाचा फुटली

तब्बल दीड वर्षापासून सुरू असलेल्या या छळामुळे महिला कमालीची दहशतीत आली. तिची अवस्था पाहून तिच्या आईने तिला विचारणा केली, त्यानंतर महिलेचा बांध फुटला. तिने आपली छळकथा आई आणि नातेवाइकांना ऐकवली. त्यामुळे प्रकरण यशोधरानगर पोलिसांकडे पोहोचले. पोलिसांनी सोमवारी रात्री या प्रकरणात गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोर आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.

---

Web Title: Torture of a married woman in the name of witchcraft