शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अत्याचार

By admin | Updated: January 14, 2017 02:40 IST

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थिनीला बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा

नागपूर : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थिनीला बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अमरीश शर्मा (३५) रा. फालके ले-आऊट फ्रेण्ड्स कॉलनी असे आरोपीचे नाव आहे. पीडित युवती बारावीची विद्यार्थिनी आहे. शर्मा हा फुटाळा चौपाटीवर चायनीज सेंटर चालवतो. विद्यार्थिनीच्या मैत्रिणीशी त्याची ओळख आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार शर्मा हा हस्तरेषा पाहून भविष्य सांगत असल्याचे माहीत झाले तेव्हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ती त्याच्या संपर्कात आली. दोन ते तीन वेळा ती शर्मा याला भेटली. आपल्या बोलण्याने शर्माने तिला संमोहित केले. तक्रारीनुसार रविवारी ८ जानेवारी रोजी शर्माने तिला फोन करून सदरच्या पुनम चेंबरजवळ बोलावले. दुपारी १ वाजता ती पुनम चेंबरजवळ पोहोचली. तिथे आपली दुचाकी ठेवून ती त्याच्या कारमध्ये बसली. शर्माने जवळपास तासभर तिच्याशी बोलत तिला सदर व मानकापूर परिसरात फिरवले. यादरम्यान तिने शर्माला पाणी मागितले. पाणी पिताच ती बेशुद्ध होऊ लागली. शर्मा तिला शहराबाहेर नेऊ लागला. याबाबत विचारले असता मित्राला भेटायचे असल्याचे सांगितले. शर्माने विद्यार्थिनीला अमरावती रोडवरील एका रिसॉर्टमध्ये नेले. रिसॉर्टमध्ये पोहोचल्यावर तिने पुन्हा पाणी मागितले. पाणी पिल्यावर ती पुन्हा बेशुद्ध झाली. यानंतर शर्माने तिच्यावर अत्याचार केला. काही वेळानंतर शुद्धीवर आल्यावर तिला घडलेला प्रकार लक्षात आला. याबाबत कुणालाही काही सांगू नको असे शर्माने सांगितले. यानंतर सायंकाळी ५ वाजता तिला पुन्हा पुनम चेंबरजवळ आणून सोडले. पीडित विद्यार्थिनीने आपल्या मित्राला आपबिती सांगितली. मित्राने शर्माला याबाबत जाब विचारला. तेव्हा शर्माने त्याला धमकावले आणि याबाबत कुणाला काही न सांगण्याची ताकीद दिली. पीडित विद्यार्थिनी बुधवारी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेली. परंतु गिट्टीखदान पोलिसांनी तिला सदर पोलीस ठाण्यात पाठवले. सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. शर्मा मात्र त्याच्यावरील आरोप नाकारत आहे. त्याचे म्हणणे आहे की, विद्यार्थिनीसोबत त्याची पुनम चेंबरजवळ भेट झाली. तेथून ते जमीन पाहण्यासाठी अमरावती रोडवर गेला होता. विद्यार्थिनी त्याला फसवित असल्याचा त्याचा आरोप आहे. शर्माला १६ जानेवारीपर्यंत कोठडीत घेण्यात आले आहे. (प्रतिनिधी)