बिर्याणी देण्याच्या बहाण्याने अत्याचार

By Admin | Updated: July 28, 2016 02:35 IST2016-07-28T02:35:33+5:302016-07-28T02:35:33+5:30

बिर्याणी खाऊ घालण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर मानलेल्या भावानेच अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Torture of boating | बिर्याणी देण्याच्या बहाण्याने अत्याचार

बिर्याणी देण्याच्या बहाण्याने अत्याचार

गिट्टीखदान परिसरातील घटना : मानलेल्या भावानेच केले कृत्य
नागपूर : बिर्याणी खाऊ घालण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर मानलेल्या भावानेच अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गिट्टीखदान परिसरात घडली.
अस्सुभय्या ऊर्फ यशवंत हीरालाल गौर (३०) रा. सुरेंद्रगड असे आरोपीचे नाव आहे. तो मासे विक्रेता आहे. पीडित १७ वर्षीय विद्यार्थिनी त्याच्या वस्तीत राहते. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार ती यशवंतला भाऊ मानते. वडिलांचा मृत्यू झाला आहे. आई मजुरी करते. २४ जुलै रोजी रात्री यशवंतने बिर्याणी खाण्यासाठी विद्यार्थिनीला मोमीनपुरा येथे चलण्यास म्हटले. यशवंतसोबत जात असल्याचे सांगून ती घरून निघाली. यशवंत तिला गिट्टीखदन चौकात घेऊन गेला. तेथून मोमीनपुरा येथे जाऊन बिर्याणी खरेदी केली. बिर्याणी घेतल्यानंतर तो तिला घेऊन गोरेवाडा उद्यान तलावाजवळ घेऊन गेला. तिथे बिर्याणी खाताना सोबत कोल्डड्रिंक सुद्धा घेतले. कोल्डड्रिंकमध्ये त्याने दारू टाकली. विद्यार्थिनीला शंका आली. तिने ती पिण्यास नकार दिला. त्याने बळजबरीने पाजली. तिला नशा येऊ लागली. याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. रात्री १ वाजता त्याने पीडित मुलीला बाईकने घरी सोडून दिले. मुलीची अवस्था पाहून आईला शंका आली. विचारपूस केली तेव्हा पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितला. गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार व अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.(प्रतिनिधी)
 

Web Title: Torture of boating