शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात कोसळल्या मुसळधारा, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 11:44 IST

सखल भागात पाणी शिरले ; माजरीला पुराच्या पाण्याचा वेढा, शेतकरी चिंताग्रस्त

नागपूर : रविवारी नागपुरात थोडा वेळ उसंत घेऊन मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले. नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी ५ ते ५.३० वाजता मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा जोर कमी असला, तरी झड सुरूच आहे. मूलमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरले. तर माजरीला पुराच्या पाण्याने वेढले होते. रविवारी सकाळी या परिसरातील पूर ओसरला असला, तरी सायंकाळपासून पावसाची झड सुरू झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. 

भंडारा जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. गोंदियात रविवारी अधूनमधून सरी बरसल्या. गडचिरोलीत पावसाने उघडीप दिली. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून वर्धा जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वणी तालुक्यातील कवडशी, चिंचोली, नवी सावंगी या तीन गावांचा संपर्क तुटला आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दारे १०० सेंटिमीटरने उघडली असून दोन हजार ५८२.३० घ.मी. प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. झरी तालुक्यातील शिबला मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. वऱ्हाडातील अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात रविवारी पावसाची रिपरिप सुरू होती. बुलडाणा जिल्ह्यात काही भागात तुरळक पावसाच्या सरी बरसल्या. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील सिंगडोह सिंगणापूर येथे नाल्याला पूर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.  

कोल्हापूर जिल्ह्यात रिपरिप

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात तुलनेत जोरदार सरी कोसळत राहिल्या.  सातारा  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढू लागला असून, रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजाला ३०, महाबळेश्वर येथे ६५ मिलीमीटरची नोंद झाली आहे तर कोयना धरणातील पाणीसाठा ६२ टीएमसीवर गेला आहे.

जगबुडी नदीचे पाणी पुन्हा इशारा पातळीवर

आठवडाभर विश्रांतीनंतर रविवारी रत्नागिरीत पावसाने पुन्हा हजेरी लावली. खेड तालुक्यातील जगबुडी नदीचे पाणी पुन्हा इशारा पातळीवर आले आहे. नदीची पाणीपातळी ५.५० मीटरपर्यंत पाेहाेचली आहे.

अप्पर वर्धा धरणाची १३ दारे उघडली

nअप्पर वर्धा प्रकल्पाचे १३ गेट २०० सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीला पूर येऊन आष्टी ते मोर्शी हा मार्ग बंद झाला आहे. आर्वी तालुक्यात कोपरा पुनर्वसन येथील २४ वर्षीय एक व्यक्ती पुराच्या पाण्यात रात्री ९ च्या दरम्यान अडकली होती. जिल्हा बचाव व शोध पथकाने या व्यक्तीस सुरक्षित बाहेर काढले. nनिम्न वर्धाचे ३१ दरवाजे १०० सेंमीने उघडणार असल्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कौंडण्यपूर पुलावरून पाणी वाहत असल्याने कौंडण्यपूर ते आर्वी रस्ता बंद झाला.

मराठवाड्यात संततधार

जालना/लातूर/परभणी : मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांत रविवारी संततधार पावसाने हजेरी लावली. जालना शहरासह जिल्हाभरात रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस झाला. सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर रिमझिम पाऊस झाला असून, गेल्या २४ तासांमध्ये २५.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यातही आतापर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्प तुडुंब भरला आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत सलग दुसऱ्या दिवशीही संततधार होती. परभणी जिल्ह्यात जुलैतील संततधार पावसाचा खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस पिकाला फटका बसला आहे. 

 

टॅग्स :RainपाऊसnagpurनागपूरVidarbhaविदर्भ