दाखल्यांच्या दलालीत अव्वल कारकून निलंबित

By Admin | Updated: June 26, 2015 02:46 IST2015-06-26T02:46:22+5:302015-06-26T02:46:22+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील दलालांसोबत संबंध ठेवणाऱ्या सेतू कार्यालयातील अव्वल कारकून अनंत मराठे यांना निलंबित करण्यात आले आहे.

Top clerks suspended in certificates | दाखल्यांच्या दलालीत अव्वल कारकून निलंबित

दाखल्यांच्या दलालीत अव्वल कारकून निलंबित

नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील दलालांसोबत संबंध ठेवणाऱ्या सेतू कार्यालयातील अव्वल कारकून अनंत मराठे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर वर्धा येथून प्रतिनियुक्तीवर आलेले अशोक नारनवरे याला निलंबित करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे शिफारस करण्यात आली आहे. तसेच उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या निर्देशानुसार काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी ्रकार्यालय परिसरातील सेतू आणि तहसील कार्यालय परिसरात सात दलालांना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सेतू कार्यालयातील १० कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करून त्यांना हटविण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी दलालांकडून ३०० रुपयांपासून १ हजार रुपयापर्यंत घेत होते. यात अनंत मराठे, अशोक नारनवरे आणि उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम यांचे नाव समोर आले होते. चौकशीनंतर मराठे यांना निलंबित केले.
नारनवरेंना निलंबित करण्यासाठी विभागीय आयुक्तांना शिफारस करण्यात आली आली आहे. तर उपजिल्हाधिकारी मेश्राम यांना कारणे दाखवा नोटीस जारी करीत ‘तुमच्या दोन वेतनवाढ का रोखण्यात येऊ नये?’ अशी विचारणा करण्यात आली आहे. ३० दिवसात उत्तर मागविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Top clerks suspended in certificates