आजची सेलिब्रेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:45+5:302020-12-02T04:11:45+5:30

जगभरातील पर्वतरांगांना साद घालणारी ‘शिवकन्या’ ------------------------- आज गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिचा वाढदिवस. ----------------------- छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेत गिर्यारोहणाकडे ...

Today's celebrity | आजची सेलिब्रेटी

आजची सेलिब्रेटी

जगभरातील पर्वतरांगांना साद घालणारी ‘शिवकन्या’

-------------------------

आज गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिचा वाढदिवस.

-----------------------

छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेत गिर्यारोहणाकडे वळलेल्या प्रियांका मोहिते हिचा जन्म ३० नोव्हेंबर १९९२ रोजी सातारा येथे झाला.

---------------------------

- उत्तराखंड येथील माऊंट बंदरपूछ येथे २१ हजार ५०० फूटची यशस्वी चढाई.

- २०१३ साली जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टची (२९,०५० फूट) यशस्वी चढाई. मा. एव्हरेस्ट चढाई करणारी महाराष्ट्राची सर्वात युवा, तर तिसरी युवा भारतीय ठरली.

- २०१६ साली आफ्रिकेतील माऊंट किलिमांजारोची (१९,३४१ फूट) यशस्वी चढाई.

- दोनवेळा अपयशी ठरल्यानंतर २०१८ मध्ये जगातील चौथे उंच शिखर मा. ल्होत्सेची (२७, ९४०) चढाई.

- २०१९ साली जगातील पाचवे उंच शिखर मा. मकालुची यशस्वी चढाई. हे शिखर पार करणारी पहिली भारतीय महिला ठरली.

-------------------------

लक्षवेधी कामगिरी :

२०१९ साली अत्यंत प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान झाला.

-------------------------

साहसी खेळांमध्ये छाप पाडत असतानाच प्रियांकाने नृत्याची आवडही जोपासली असून तिने भरतनाट्यम नृत्य विशारद प्राप्त केले आहे.

Web Title: Today's celebrity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.