शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आज व्हॅलेंटाइन डे : रंग प्रेमाचा, उधळण प्रीतीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 11:43 PM

आपल्या सहवासाला व कृतीला पावित्र्य असल्याची खात्री असायला हवी, यातून जवळीक वाढावी, स्नेहबंध जुळावेत आणि एका उदात्त, पवित्र भावबंधनाचे नाते निर्माण व्हावे. हाच खरा ‘व्हॅलेंटाईन डे’चा संदेश आहे.

ठळक मुद्देतऱ्हा बदलली, भावना तीच : कुठे ‘नेट-भेट’ तर कुठे थेट ‘हाल ए दिल’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मन:पटलावरील अस्पष्ट जाणिवांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाइन डे’, १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाईन डे’ मानला जातो, ‘व्हॅलेंटाईन’ या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रेमाचा संदेश पाठविणारा मंत्र किंवा भेटकार्ड मग ते आई-वडिलांपासून बहीण-भावंडे, मित्र-मैत्रिणी कुणालाही पाठविलेला असो, एवढा उदात्त हेतू असूनही अलीकडे आपणच त्याला विकृत स्वरूप दिले आहे. सध्या या दिवसाला फक्त रोमँटिक डे एवढेच स्वरूप आले आहे. प्रेमभावनेच्या ऊर्जेचा अपव्यय न होता जीवनप्रवाह अधिक चांगला होण्यासाठी याचा उपयोग व्हायला हवा, मनाच्या प्रीतिपाकळ्या अलगदपणे उलगडत जात असताना त्या चुरगळल्या जाणार नाहीत, याचा विश्वास पक्का व्हायला हवा. आपल्या सहवासाला व कृतीला पावित्र्य असल्याची खात्री असायला हवी, यातून जवळीक वाढावी, स्नेहबंध जुळावेत आणि एका उदात्त, पवित्र भावबंधनाचे नाते निर्माण व्हावे. हाच खरा ‘व्हॅलेंटाईन डे’चा संदेश आहे.एक काळ होता जेव्हा मंदिरात जायचा बहाणा करून ती भेटायला यायची. ‘मै तुझसे मिलने आयी मंदिर जाने के बहाने’ असेच तिचे सांगणे असायचे. मात्र त्यावेळी युवांमध्ये एवढा बोल्डनेस नव्हता. त्यामुळेच की काय कॅन्टीन असो की क्लासरूम! वर्गात कसे तो आणि ती दूर-दूर बसायचे. ट्युशनमध्ये त्याने तिच्याकडे बघितले की इतर सारे शंकेने बघायचे. एकमेकांच्या ट्युशन सुटण्याच्या वेळेत दोघेही बाहेर उभे राहायचे. हळूच दबकत-दबकत मग सायकल नाही तर लुनाच्या चिमट्यात फुलं खोचायचे. सर्वांच्या पुढ्यात नजरा चुकवून बघणे ‘आँखो ही आँखो’ मे काहीतरी व्हायचे. आता जमाना ‘व्हॉटस्अ‍ॅप’चा आहे. त्यामुळे ‘तू है की नही...’असे न म्हणता थेट ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर दिवसभर ‘नेट-भेट’ करण्यावर भर असतो.तेव्हा व्यक्त करण्याची ई-माध्यमे फारशी नव्हती. मोबाईल एसएमएसचे पॅक आकर्षक व्हायचे होते. ‘आॅर्कुट’ जेमतेम आले होते, मात्र ‘फेसबुक’ची बूम नव्हती. आता झपझप बदल झाले.काही संघटना विरोध करतात म्हणून प्रेमदिन नाहीसा झाला नाही. संवादाची गरज‘युनिव्हर्सल’ असल्याने प्रेम आहेच आहे टिकून! बदल एवढाच झाला की वर्षभरातून एकदा येणारा प्रेमदिन आता अनेकांसाठी रोजचाच झालाय! व्हीआयपी रोड घ्या की फुटाळ्याची चौपाटी, याचे प्रत्यंतर वर्षभर आपणासही येईलच! आपण रोजच जगतो तरी वाढदिवस असतोच ना? तसाच हा प्रेमदिन! हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!गुरुवारीच प्रियकर-प्रेयसींची भेट : विरोध करणाऱ्यांचा मनस्ताप टाळलाव्हॅलेंटाईन डे १४ तारखेला असला तरी अनेक कपल्सनी तो गुरुवारी १३ च्या सायंकाळीच उरकून घेतला, तर काहींनी १५ तारखेला फिरायला जाण्याचे ‘प्रॉमिस’ केले आहे. ‘दिल की दिल से बात’ झाली आहे... जरा माहोलच तसा आहे... १४ ला तेच दरवर्षीचे टेन्शन... सगळीकडेच धुमाकूळ... पोलिसांची करडी नजर... नकोच! व्हॅलेंटाईन डे साजरा होणार आहे, पण जरा सेफली!‘रक्षकांची’ दहशत आणि तरुणाईला फुटलेले पंख अशा परिस्थितीत ‘व्हॅलेंटाईन डे’ शनिवारी साजरा होत आहे. अंबाझरी, जपानी उद्यान, तेलंगखेडी, महाराजबाग, सेमिनरी हिल्स ही ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याची मनपसंत ठिकाणं. दरवर्षी एखादी संघटना किंवा पक्षाकडून ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोधाचा फतवा निघतो आणि त्यामुळे प्रेमवीरांचे ‘टेन्शन’ वाढते. विरोधाची शक्यता लक्षात घेता, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या आदल्या दिवशी गुरुवारी बहुसंख्य युगुलांनी शहरातील महत्त्वाच्या उद्यानात गर्दी केली होती. महाविद्यालयातही नेहमी असणारी विद्यार्थ्यांची संख्या आज रोडावलेली असल्याचे चित्र होते. अनेकांनी तर थेट मॉल्स व रेस्टॉरंट गाठले होते.यातील काही युगुलांशी चर्चा केली असता प्रसाद-तृप्ती या जोडीने सांगितले की, उद्यानात प्रेमीयुगुलांना मारहाण करण्याच्या घटना काही वर्षांपासून घडत आहेत. नागपुरात अशी घटना घडली नसली तरी कशाला हवा मनस्ताप म्हणून एक दिवस अगोदरच हा दिवस साजरा करण्याचा बेत आखला. विशेष म्हणजे गुलाबाची फुलेही स्वस्त आहेत. प्रवीण-पायल या युगुलांनी सांगितले की, उद्या हिला घरून निघणे कठीण आहे. तसेच कसेतरी भेटलो तरी अनेकांच्या नजरा युगुलांकडे पाहण्याच्या वेगळ्या असतात. ते नकोच म्हणून आजच भेटण्याचा बेत आखला.

 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेnagpurनागपूर