आज ‘व्हॅलेंनटाईन डे’,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST2021-02-14T04:09:43+5:302021-02-14T04:09:43+5:30
नागपूर : रविवार, १४ फेब्रुवारी प्रेमवीरांचा हक्काचा दिवस. या दिवसी प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाबाचे फूल एकमेकांना देण्याची ...

आज ‘व्हॅलेंनटाईन डे’,
नागपूर : रविवार, १४ फेब्रुवारी प्रेमवीरांचा हक्काचा दिवस. या दिवसी प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाबाचे फूल एकमेकांना देण्याची प्रथा आहे. ‘व्हॅलेंनटाईन डे’ निमित्ताने फूल बाजारात गेल्या तीन दिवसांत लाल डच गुलाबाची आवक वाढली असून जवळपास ५ लाख फुलांची आवक झाली. किरकोळमध्ये एका डच गुलाब फुलाचे भाव ४० रुपये होते. रविवारी दरवाढीची शक्यता आहे.
सीताबर्डी येथील ठोक फूल बाजार असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, व्हॅलेंनटाईन डे निमित्ताने पुणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यातून डच गुलाबाची आवक वाढली आहे. बाजारात सहा जण या फुलांची विक्री करतात. त्याकडे जवळपास ५ लाख फुलांची आवक झाली आहे. शनिवारी ३५० ते ४०० रुपये बंडल (एक बंडल २० फुले) असे भाव होते. किरकोळ विक्रेत्यांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आणि जास्त दराने विक्री केली. रविवारी आवक कमी राहणार आहे. यंदा लोकल गुलाबाची आवक कमी आहे. कोरोनामुळे अनेकांनी लागवड केली नाही. त्यामुळे १४ फेब्रुवारीला सण साजरा करणाऱ्यांना डच गुलाब जास्त भावात खरेदी करावे लागतील.