‘लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअर’ आजपासून
By Admin | Updated: June 6, 2014 00:54 IST2014-06-06T00:54:56+5:302014-06-06T00:54:56+5:30
लोकमत व मोशन प्रस्तुत आणि वरसिटी प्रायोजित ‘लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या काँग्रेसनगर येथील प्रांगणात शुक्रवार ६ जून रोजी सकाळी ११ वाजता

‘लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअर’ आजपासून
शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविणार्यांसाठी विशेष प्रदर्शन
नागपूर : लोकमत व मोशन प्रस्तुत आणि वरसिटी प्रायोजित ‘लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या काँग्रेसनगर येथील प्रांगणात शुक्रवार ६ जून रोजी सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, मोशन संस्थेचे प्रमोद वालवांढरे, क्षितिज राज, रजनीकांत बोंदरे, श्याम शेंदरे, पाणिनी तेलंग व डी.के.बुरघाटे उपस्थित राहतील.
आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दज्रेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, वर्षाला किती फी भरावी, अनुदानाचे काय, असे एक ना अनेक प्रश्न सध्या पालकांच्या मनात घोळ निर्माण करीत आहे. यासाठीच ‘लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सर्व नामांकित शैक्षणिक संस्थेची इत्थंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांंच्या भावी करिअरसाठी दिशादर्शक ठरणारे हे प्रदर्शन म्हणजे जणू शैक्षणिक कुंभमेळाच ठरणार आहे. तसेच या उपक्रमाद्वारे व्यावसायिकांनाही हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंंंत पोहोचता येणार आहे. शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणार्या ‘लोकमत समूहा’तर्फे यंदाही अँस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. हे भव्य शैक्षणिक प्रदर्शन ६ ते ८ जूनदरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंंंत सर्वांंंसाठी खुले राहील.
विशेष म्हणजे या प्रदर्शनात शिक्षणाविषयीच्या अनेक शंकाकुशंकांचे निराकरण करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ या प्रदर्शनात मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनीअरिंग, आर्किटेक्टचरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटिरियर डिझाईनपर्यंंंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अँनिमेशन, गेमिंगपर्यंंंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेज, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटीलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूट प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजानाच उपलब्ध होणार आहे.
लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअरला भेट द्यावी आणि भविष्याची योग्य दिशा निवडावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)