शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

आज अयोध्याप्रमाणे सजेल उपराजधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:57 AM

भगवान श्रीराम जन्मोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून रामभक्त यासाठी सज्ज झाले आहेत. पोद्दारेश्वर राममंदिर व रामनगरच्या राममंदिरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून रामनवमीच्या या भक्तिमय वातावरणात उपराजधानीला पुन्हा एकदा अयोध्येचे रूप प्राप्त होणार आहे.

ठळक मुद्देरामनवमीच्या शोभायात्रेसाठी रामभक्त सज्ज : जय श्रीरामने दुमदुमणार आकाश

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : भगवान श्रीराम जन्मोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून रामभक्त यासाठी सज्ज झाले आहेत. पोद्दारेश्वर राममंदिर व रामनगरच्या राममंदिरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून रामनवमीच्या या भक्तिमय वातावरणात उपराजधानीला पुन्हा एकदा अयोध्येचे रूप प्राप्त होणार आहे. यानिमित्त मंदिरात स्थापन झालेले घट विसर्जित केले जाणार असून विविध राममंदिरात विशेष आयोजन केले जाणार आहे.पोद्दारेश्वर राममंदिराच्या अनेक वर्षाच्या परंपरेनुसार रविवारी भव्य श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात येणार आहे. मंदिरात पहाटे ४ वाजता उत्थापन, मंगल आरती, भगवान रामाचा अभिषेक व अभ्यंगस्नान केले जाईल. पहाटे ५ वाजता शहनाई वादन होईल. सकाळी ९ वाजता श्रीरामकृष्ण मठ संकीर्तन मंडळातर्फे कीर्तन सादर करण्यात येईल. दुपारी १२ वाजता भगवान रामाला अभिषेक आणि षोडशोपचार पूजन करण्यात येईल.दुपारी ४ वाजता रथावर विराजमान प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्र्तींचे पूजन महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते केले जाईल. याप्रसंगी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार अजय संचेती, पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्र सभापती दीपक म्हैसकर, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, अनिल सोले, गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, अनिस अहमद, रमेश बंग, दीनानाथ पडोळे, जयप्रकाश गुप्ता, दयाशंकर तिवारी, वीरेंद्र कुकरेजा, तानाजी वनवे आदी उपस्थित राहणार आहेत.आकर्षण ठरेल भगवान रामाचा रथवृंदावन येथील निधीवनाच्या कल्पनेतून महारास सादर करतानाचा भगवान श्रीराम यांचा मुख्य रथ लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या रथाला विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे. याशिवाय १०८ भगिनी डोक्यावर कलश घेऊन शोभायात्रेसह चालणार आहेत.पहिल्यांदा फेसबुक लाईव्हशोभायात्रा समितीचे तरुण सदस्य यावर्षी पहिल्यांदा फेसबुकवर शोभायात्रेचे लाईव्ह प्रसारण करणार आहेत. समितीचे वरिष्ठ कार्यकर्ता पुनित पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार या युवकांनी फेसबुक लाईव्हसाठी विविध ठिकाण निश्चित केले आहेत.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरnagpurनागपूर