‘कोटा’ पूर्ण करताना होणार दमछाक

By Admin | Updated: June 19, 2014 00:58 IST2014-06-19T00:58:09+5:302014-06-19T00:58:09+5:30

विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत एक लाखावर नवीन मतदारांची भर पडल्याने यावेळी प्रथम पसंतीच्या विजयी मतांचा कोटा हा मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे.

Tired of completing 'quota' | ‘कोटा’ पूर्ण करताना होणार दमछाक

‘कोटा’ पूर्ण करताना होणार दमछाक

पदवीधर मतदारसंघ : मतदान वाढण्याची शक्यता
नागपूर: विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत एक लाखावर नवीन मतदारांची भर पडल्याने यावेळी प्रथम पसंतीच्या विजयी मतांचा कोटा हा मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांच्या जोरावर विजयी होताना उमेदवारांची दमछाक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
२० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या १ लाख ८३ हजार ७२६ वरून २ लाख ८७ हजार ६२२ पर्यंत वाढली आहे. निवडणुकीत निर्माण झालेली चुरस लक्षात घेता यावेळी मतदानाची टक्केवारीही वाढण्याची शक्यता आहे. असे झाले तर प्रथम पसंतीच्या विजयी मतांचा कोटा वाढू शकतो.
उमेदवारांनी कोटा पूर्ण केला नाही तर त्यानंतरच्या पसंतीक्रमांच्या मतांची मोजणी होते. २००८ च्या निवडणुकीत एकूण वैध मतांच्या ५० टक्केपेक्षा अधिक पहिल्या पसंतीची मते (५२७६१) गडकरींना मिळाली होती. त्यांनी विजयी मतांचा कोटा पूर्ण केल्याने इतर पसंती क्रमाची मते मोजण्यात आली नाही. बबन तायवाडे यांनी दुसऱ्या क्रमांकाची ( २८ हजार ८६६) मते घेतली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Tired of completing 'quota'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.